उबाळी
Appearance
?उबाळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नागपूर |
जिल्हा | नागपूर |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 441501 • MH |
उबाळी हे महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूरपासून पश्चिमेस सुमारे ३१ किमी लांब आहे. हे गाव नागपूर- कळमेश्वर-मोहपा रस्त्यावर आहे.
या गावाजवळ सुमारे ६७ प्राचीन अश्मवर्तुळे सापडली आहेत.[१] अश्मवर्तुळे ही एक प्रकारची थडगी असतात. त्या थडग्यांसभोवताल दगड गोलाकार रचून वर्तुळे करण्यात येतात. त्यांना अश्मवर्तुळे म्हणतात.ही पद्धत भारतात प्राचीन काळी अस्तित्वात होती.[ संदर्भ हवा ]
रातुम नागपूर विद्यापीठाच्या इतिहास,संस्कृती व पुरातत्त्व विभागातर्फे या ठिकाणी असलेल्या सपाट टेकडीवर हे उत्खनन सुरू आहे. येथे मानवी हाडांसमवेतच घोड्याचा एक सांगाडाही सापडला आहे. पुरातत्त्वदृष्टीने हे महत्त्वाचे स्थान आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |