गती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
"वस्तूच्या स्थानात घडणारा बदल", ही संकल्पना रेल्वे स्थानकातून गाडी हलू लागताना अनुभवास येते. (चित्रस्थळ: योंग्सान स्थानक, सोल, दक्षिण कोरिया)

भौतिकशास्त्रानुसार गती[१] (मराठी लेखनभेद: गति ; इंग्लिश: Motion, मोशन) म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थितीत कालौघात होणारा बदल होय. सहसा वेग, त्वरा, स्थानांतरकाळ इत्यादी राशींच्या आधारे गती व्यक्त केली जाते.

पुष्कळदा हिची गल्लत चाल, वेग या भौतिक राशींशी घडू शकते. परंतु एखाद्या चल वस्तूने विशिष्ट काळात कापलेले विशिष्ट अंतर चाल या अदिश राशीने दर्शवले जाते; तर चल वस्तूने विशिष्ट दिशेत विशिष्ट कालावधीत केलेले स्थानांतर वेग या सदिश राशीने दर्शवले जाते. गती मात्र वस्तूची चल अवस्थाच दर्शवते.

गती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या स्थितीत काळानुसार होणारा बदल होय.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ भौतिकशास्त्र परिभाषा कोश (मराठी मजकूर). भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन. इ.स. १९८८. पान क्रमांक ६३०. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.