इस्रायलचे राष्ट्रपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्रायलचे राष्ट्रपती
נשיא מדינת ישראל
נס הנשיא משופר.JPG
राष्ट्रपती मानक
Isaac Herzog Presidential Visit to the United Arab Emirates, January 2022 (GPOABGEXPO 6) (cropped).jpg
विद्यमान
आयझॅक हेर्झोग

७ जुलाई २०२१ पासून
शैली महामहीम
नियुक्ती कर्ता क्नेसेट
कालावधी सात वर्ष, एक सत्र
पहिले अधिकारी चैम वाइझमन
निर्मिती १६ फेब्रुवारी १९४९
संकेतस्थळ राष्ट्रपतींचे संकेतस्थळ

इस्रायलचे राष्ट्रपती हे इस्रायल देशाचे राष्ट्रप्रमुख आहे. हे पद प्रामुख्याने एक औपचारिक पद आहे कारण कार्यकारी शक्ती प्रभावीपणे इस्रायलच्या पंतप्रधानांच्या जवळ आहे. २४ जुलै २०१४ पासून सध्याचे राष्ट्रपती रेउव्हेन रिव्हलिन नियुक्त झाले आहेत. इस्रायलचे विधानमंडळ क्नेसेट हे इस्रायलचे राष्ट्रपती सात वर्षांच्या कालावधीसाठी निवडून देते आणि एका व्यक्तिला आता केवळ एकदाच नियुक्त करता येते.

पात्रता, अधिकार आणि जबाबदारी[संपादन]

इस्रायलची लिखित घटना नाही, पण अनेक मूलभूत कायदे आहेत जे घटनेची स्थिती धारण करतात. राष्ट्रपतींची पात्रता, अधिकार आणि जबाबदाऱ्या १९६४ च्या मूलभूत कायद्यामध्ये वर्णन केल्या आहेत. राष्ट्रपती इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि इस्रायलमधे रहाणारे इस्रायलचे नागरिक असले पाहिजे. क्नेसेट हे इस्रायलचे राष्ट्रपती सात वर्षांच्या कालावधीसाठी निवडून देते. पदस्त राष्ट्रपतींचा कालावधी संपायच्या ९० दिवसां पुर्वी किंवा कालावधी समाप्त झाल्यानंतर पुढील ३० दिवसांच्या आत पुढील राष्ट्रपतींची निवडणूक घ्यावी लागते. राष्ट्रपतींचे कार्यालय कोणत्या आपत्तीमध्ये रिक्त झाले असल्यास नव्या राष्ट्रपतींची ४५ दिवसांत निवडणूक व्हावी अशी तरतुद आहे.[१]

राष्ट्रपतींशी संबंधित सोडुन इस्रायलचे सर्व कायद्यांवर राष्ट्रपती हस्ताक्षर करतात. ते न्यायव्यवस्थेच्या न्यायिक नियुक्त्या व निलंबनाचे काम पण करतात. त्यांच्या जवळ एखाद्या अपराधीची शिक्षा कमी किंवा बदलण्याची सोय उपलब्ध आहे.[१]

यादी[संपादन]

खालील नमुद केलेली राष्ट्रपती / राष्ट्राध्यक्षांची यादी आहे:

रंग दल
जनरल ज़्योनिस्ट्स
मपई / इस्रायली लेबर पार्टी /
अलाइनमेंट (इस्रायल)
लिकुड
कदिमा

अस्थायी राज्य परिषदेचे अध्यक्ष (१९४८-१९४९)[संपादन]

अस्थायी राज्य परिषदेचे स्थापना मोत्ज़ेट ह-आम (अर्थ: लोकांची परिषद) या नावाने झाली होती. १४ मे १९४८ला इस्रायलच्या स्वतंत्रता घोषणे नंतर १९४९ मध्ये राष्ट्रपती निवडणूक होई पर्यंत या अस्थायी राज्य परिषदेचे अध्यक्ष इस्रायलचे राष्ट्रप्रमुख होते. पहिल्या राष्ट्रपती निवडणूकी नंतर परिषदेचे अध्यक्ष चैम वाइझमन इस्रायलचे राष्ट्रपती म्हणुन निवडून आले.[२]

अध्यक्ष नियुक्त
(सत्र)
क्र॰ चित्र नाव
(जन्म – मृत्यु)
कालावधी राजनीतिक दल
(नियुक्तिच्या वेळी)
Ben-Gurion.jpg डेव्हिड बेन-गुरियन
(१६ ऑक्टोबर १८८६ - १ डिसेंबर १९७३)
१४ मे १९४८ १६ मे १९४८ मपई -
Flickr - Government Press Office (GPO) - President Chaim Weizmann.jpg चैम वाइझमन
(२७ नोव्हेंबर १८७४ - ९ नोव्हेंबर १९५२)
१६ मे १९४८ १७ फेब्रुवारी १९४९ जनरल ज़्योनिस्ट्स -

इस्रायलचे राष्ट्रपती (१९४९-वर्तमान)[संपादन]

१६ फेब्रुवारी १९४९ला इस्रायलच्या पहिल्या राष्ट्रपती निवडणूकी मध्ये क्नेसेट ने चैम वाइझमनला ८३ मत मिळाले व विरोधी नेते जोसेफ क्लाउसनरला १५ मत मिळाले. वाइझमन अशा प्रकारे इस्रायलचे पहिल्या राष्ट्रपती निवडणून आले. १९ नोव्हेंबर १९५१ला दुसऱ्या क्नेसेट ने वाइझमनयांना निर्विवाद निवडुन दिले.[३] पण ९ नोव्हेंबर १९५२ला राष्ट्रपती पदावर कार्यरत असतानावच वाइझमन यांचा मृत्यु झाला.[४] वाइझमन नंतर डिसेंबर १९५२ मध्ये यित्झाक बेन-झ्वी राष्ट्रपती झाले. ते नंतर १९५७ आणि १९६२ मध्ये निर्विवाद निवडून आले. १९६३ मध्ये बेन-झ्वीच्या मृत्यु नंतर झल्मान शाझर तिसरे राष्ट्रपती झाले आणि १९६८ मध्ये पुन्हा निर्विवाद निवडून आले. १९८३ मध्ये निवडून आलेले चैम हेर्झॉग १९८८ मध्ये निर्विवाद निवडून आले. एझेर वाइझमन जे १९९३ मध्ये राष्ट्रपती झाले, परत १९९८ मध्ये जिंकले; पण हे पहिले पदस्त राष्ट्रपती होते जे निर्विवाद जिंकले नाही.[३]

अध्यक्ष नियुक्त
(सत्र)
क्र॰ चित्र नाव
(जन्म – मृत्यु)
कालावधी राजनीतिक दल
(नियुक्तिच्या वेळी)
Flickr - Government Press Office (GPO) - President Chaim Weizmann.jpg चैम वाइझमन
(२७ नोव्हेंबर १८७४ - ९ नोव्हेंबर १९५२)
१७ फेब्रुवारी १९४९ २५ नोव्हेंबर १९५१ जनरल ज़्योनिस्ट्स १९४९ (१वे)
२५ नोव्हेंबर १९५१ ९ नोव्हेंबर १९५२ १९५१ (२वे)
Yitzhak Ben-Zvi.jpg यित्झाक बेन-झ्वी
(२४ नोव्हेंबर १८८४ - २३ एप्रिल १९६३)
१६ डिसेंबर १९५२ २८ ऑक्टोबर १९५७ मपई १९५२ (३वे)
२८ ऑक्टोबर १९५७ ३० ऑक्टोबर १९६२ १९५७ (४वे)
३० ऑक्टोबर १९६२ २३ एप्रिल १९६३ १९६२ (५वे)
Zalman Shazar.jpg झल्मान शाझर
(२४ नोव्हेंबर १८८९ - ५ ऑक्टोबर १९७४)
२१ मे १९६३ २६ मार्च १९६८ मपई १९६३ (६वे)
२६ मार्च १९६८ २४ मे १९७३ १९६८ (७वे)
EKatzir771.jpg एफ़्रैम काटजीर
(१६ मे १९१६ - ३० मे २००९)
२४ मे १९७३ २९ मे १९७८ अलाइनमेंट (इस्रायल) १९७३ (८वे)
Yitzhak Navon 1.jpg यित्झाक नावोन
(९ एप्रिल १९२१ - ७ नोव्हेंबर २०१५)
२९ मे १९७८ ५ मे १९८३ अलाइनमेंट (इस्रायल) १९७८ (९वे)
चित्र:Chaim-herzog.jpg चैम हेर्झॉग
(१७ सप्टेंबर १९१८ - १७ एप्रिल १९९७)
५ मे १९८३ २३ फेब्रुवारी १९८८ अलाइनमेंट (इस्रायल) १९८३ (१०वे)
२३ फेब्रुवारी १९८८ १३ मे १९९३ १९८८ (११वे)
Ezer Weizman 1978-2.jpg एझेर वाइझमन
(१५ जून १९२४ - २४ एप्रिल २००५)
१३ मे १९९३ ४ मार्च १९९८ इस्रायली लेबर पार्टी १९९३ (१२वे)
४ मार्च १९९८ १३ जुलै २००० § १९९८ (१३वे)
Moshe Katsav 2, by Amir Gilad.JPG मोशे कात्साव्ह
(५ डिसेंबर १९४५ – )
१ ऑगस्ट २००० १ जुलै २००७ § लिकुड २००० (१४वे)
Shimon Peres, WJC Plenary Assembly, 2009.jpg शिमॉन पेरेझ
(२ ऑगस्ट १९२३ – २८ सप्टेंबर २०१६)
१५ जुलै २००७ २४ जुलै २०१४ कदिमा २००७ (१५वे)
१० Reuven Rivlin as the president of Israel.jpg रेउव्हेन रिव्हलिन
(९ सप्टेंबर १९३९ – )
२४ जुलै २०१४ ७ जुलाई २०२१ लिकुड २०१४ (१६वे)
११ Isaac Herzog.jpg आयझॅक हेर्झोग
(२२ सप्टेंबर १९६० - )
७ जुलाई २०२१ वर्तमान लेबर २०२१ (१७वे)
- पदस्त असतान मृत्यु झाला
§ - पदावरून राजिनामा दिला

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Basic Law: The President of the State" (इंग्रजी भाषेत). 3 नवम्बर 2017 रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ मेड्डींग, पीटर. The Founding of Israeli Democracy, 1948-1967 (इंग्रजी भाषेत). p. १४. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)
  3. ^ a b "Previous Presidential Elections" (इंग्रजी भाषेत). ३ नवम्बर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ फ्रेड ग्लूकेस्टीन. "Churchill and Dr. Chaim Weizmann: Scientist, Zionist, and Israeli Statesman" (इंग्रजी भाषेत). ३ नवम्बर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

श्रेणी:विभिन्न देशों के राष्ट्रपति