Jump to content

इयान मॅककेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इयान मरे मॅककेलन
इयान मरे मॅककेलन
जन्म २५ मे, १९३९ (1939-05-25) (वय: ८५)
बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९५९ ते चालू
भाषा इंग्लिश भाषा
प्रमुख नाटके हेन्री ४, डॉक्टर फ़ौस्तस
प्रमुख चित्रपट लॉर्ड ऑफ द रिंग्स, द होब्बिट, x मेन
पुरस्कार ६ लौरेन्स ऑलिवर पुरस्कार, १ टोनी पुरस्कार, १ गोल्डन ग्लोब पुरस्कार, २ क्रिटिक्स चोइस पुरस्कार
वडील डेनिस मकेलन
आई मार्जेरी लुई
अधिकृत संकेतस्थळ [१]

सर इयान मरे मॅककेलन (२५ मे, इ.स. १९३९:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हे एक ब्रिटिश अभिनेता आहेत. गेली सुमारे ५५ वर्षे हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेले इएन इंग्रजी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानले जातात. त्यांनी बऱ्याच चित्रपटात कामे केली आहेत. त्यापैकी काही चित्रपटातील व्यक्तिरेखा लोकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. त्यांनी ज्या नावाजलेल्या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका केल्या त्या पैकी लॉर्ड ऑफ द रिंग्स, द हॉबिट आणि एक्स मेन ह्या अजरामर झाल्या. त्यांना इंग्रजी चित्रपटसृष्टीतील बरेच अत्युच सन्मान मिळालेत. ६ लौरेन्स ऑलिवर पुरस्कार, १ टोनी पुरस्कार, १ गोल्डन ग्लोब पुरस्कार, २ क्रिटिक्स चोइस पुरस्कार व अश्या विविध सन्मानांनी त्यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द भूषवली गेली. २ अकॅडेमी पुरस्कार (ऑस्कर), ५ एमी पुरस्कार आणि ४ बाफ्टा पुरस्कार ह्या साठी त्यांचे उमेदवारी अर्ज पुरस्कृत केले गेले.

लॉर्ड ऑफ द रिंग्स आणि द हॉबीट ह्या चित्रपटांमधे गेंडाल्फएक्स मेन मध्ये माग्निटो म्हणून ते भरपूर प्रसिद्ध झाले.

बाह्य दुवे

[संपादन]