इंडियन फोर्थ कोअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंडियन फोर्थ कोअर हा ब्रिटिश भारतीय सैन्याचा एक भाग होता. याची रचना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांदरम्यान झाली होती. दोन्ही महायुद्धांत हे सैन्य दोस्त राष्ट्रांकडून लढले.

पहिल्या महायुद्धात फोर्थ कोर पश्चिम युरोपात लढले. दुसऱ्या महायुद्धात हे सैन्य सुरुवातीस नॉर्वेत लढले तसेच ब्रिटनमध्ये तैनात होते. जपानने म्यानमारमार्गे भारतावर आक्रमण केल्यावर यास भारतास रवाना करण्यात आले.