इंंफाळची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंफाळची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
इंफाळ-कोहिमा रस्त्यावरून चाल करीत जाणारे गुरखा सैनिक.
इंफाळ-कोहिमा रस्त्यावरून चाल करीत जाणारे गुरखा सैनिक.
दिनांक ८ मार्च-३ जुलै, इ.स. १९४४
स्थान इंफाळ, मणिपूर, भारत
परिणती दोस्तांचा निर्णायक विजय
युद्धमान पक्ष
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


भारत ध्वज भारत

जपान ध्वज जपान


Flag of the Indian Legion.svg आझाद हिंद फौज

सेनापती
युनायटेड किंग्डम विल्यम स्लिम
युनायटेड किंग्डम जॉफ्री स्कूनस्
युनायटेड किंग्डम जॅक बाल्डविन
जपान मासाकासू सावाबे
जपान रेन्या मुतागुची
Flag of the Indian Legion.svg सुभाष चंद्र बोस
सैन्यबळ
४ इन्फंट्री डिव्हिजन
१ चिलखती ब्रिगेड
१ पॅराशूट ब्रिगेड
३ इन्फंट्री डिव्हिजन
१ रणगाड्यांची रेजिमेंट
बळी आणि नुकसान
१२,६०३ हताहत ५४,८७९ हताहत

इंफाळची लढाई ही मार्च १९४१ ते जुलै १९४१ दरम्यान भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ शहराच्या आसपास लढली गेलेली लढाई होती. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन मध्यात घडलेल्या या लढाईत ब्रिटिश व भारतीय सेनेने जपान व जपानकडून लढणाऱ्या आझाद हिंद फौजेचा सडकून पराभव केला. कोहिमाची लढाई व या लढाईनंतर जपान्यांनी भारतावर चाल करून येण्याची योजना आखडती घेतली व परत ब्रम्हदेशसिंगापूरकडे माघार घेतली.