आशाकिरणवाडी
आशाकिरणवाडी(इंग्रजी-Ashakiranwadi) या गावाचे पूर्वीचे नाव वैतागवाडी होते.. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शिफारसीनुसार या गावाचे नाव बदलून आशाकिरणवाडी असे झाले.
स्थान
[संपादन]आशाकिरणवाडी हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आदिवासी लोकवस्ती असलेले एक गाव आहे. ह्या गावाच्या पूर्वेला मालुंजे पश्चिमेला वाघेरे दक्षिणेला मोगरे तर उत्तरेला धोंगडेवाडी अशी गावे आहेत.
इतिहास
[संपादन]ह्या गावचे लोक मुळचे धोंगडेवाडीचे पण तेथील काही लोक नेहमी आजारी पडत असत.म्हणून या आजाराला वैतागून त्यांनी धोंगडेवाडी पासून १ किमी अंतरावर एक वस्ती वसवली तिला वैतागवाडी असे नाव दिले होते. पण भारतीय अॅग्रो-इंडस्ट्रीज फाऊंडेशन (बाएफ)(BAIF)च्या उपक्रमाअंतर्गत येथे एका कार्यक्रमासाठी भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी १५ ऑक्टोंबर २००५ रोजी या गावाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी गावाला आशाकिरणवाडी हे नवीन नाव दिले.
लोकसंख्या
[संपादन]जनगणना इ.स.२०११ नुसार आशाकिरणवाडीत ४५० लोक राहतात. त्यांतले बहुसंख्य महादेव कोळी समाजाचे लोक आहेत.
शाळा
[संपादन]आशाकिरणवाडीत जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असलेली प्राथमिक शाळा आहे. १४ एप्रिल १९८५ रोजी ही शाळा सुरू झाली.