आयबेरीया एयर लाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आयबेरीया एयर लाइनची कायदेशीर नोंदणी आयबेरीया या नावाने सन १९२७ साली झाली. ही स्पेन देशाची झेंडा धारी विमान कंपनी आहे. आयबेरीया विमान सेवा माद्रिद या मुख्य ठिकाणाचे बराजस विमानतळ आणि बार्सिलोना एल प्रात विमानतळावरून विमान सेवा आयबेरीया ग्रुपचे भाग असणार्‍या आयबेरीया प्रादेशिक आणि आयबेरीया एक्सप्रेस या स्वतंत्र एयर नोस्त्रोमचे मदतीने पुरविली जाते. या विमान प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतुकी बरोबरच ही विमान कंपनी इतर सहाय्यक कामकाज करते त्यात विमान व्यवस्थापन, दुरूस्ती, विमान दक्षता, आयटी वापर, विमान आहार व्यवस्था, यांचा समावेश आहे.

इतिहास[संपादन]

दि.२८ जून १९२७ रोजी या कंपनीची आयबेरीया कोंपनीय एरेय दे वाहतूक या नावाने नोंदणी झाली होती. त्यावेळी होरकीओ एचेवररीता आणि डच लुफ्ट हंसा या भांडवलदारांनी १.१ मिल्लियन पेसेटस भांडवल गुंतवणूक केलेली होती. दि.१४ डिसेंबर १९२७ रोजी प्रत्यक्षात विमान सेवा सुरू झाली. स्पॅनिश सरकारने त्या एका वर्षातच या विमान कंपनीकडे माद्रिद ते बार्शीलोणा ही टपाल सेवा बहाल केली. सन १९२८ सालाचे सुरवातीस तेथील हुकूमशहा बादशाह मुगल प्रिमो दे रिवेरा यांनी स्पेन देशातील सर्व विमान कंपनीचे एकत्रीकरण केले आणि त्या विमान कंपनीना देशातील सामान्य जनतेसाठी देशाचे अधिकाराखाली आणल्या. त्याचा परिणाम म्हणजे आयबेरीया विमान कंपनी कोंपनीय दे लिणेयास एरेयस सुब्वेंकिओनाडस (C.L.A.S.S.A.) मध्ये समाविष्ट झाली आणि त्यामुळे या स्वतंत्र कामं करत असलेल्या विमान कंपनीचे कामकाज २९ मे १९२९ रोजी बंद झाले.[१] मात्र या एकत्रित झालेल्या सर्व विमान कंपनीचे नाव सरकारने आयबेरीया की जे प्रथम नोंदणीत होते तेच कायम ठेवले. ही पूर्णतः आंतरदेशीय विमान कंपनी झाली. दि.३० सपटेंबर १९४४ रोजी या विमान कंपनीचे राष्ट्रीयकरण झाले आणि ती INI ची भाग झाली. सन १९४६ मध्ये दुसर्‍या महायुद्धांनंतर डगलस DC-4 या विमानाच्या सहायाने यूरोप आणि दक्षीन अमेरिकेत माद्रिद ते ब्यूनोस ऐरीज पर्यन्त विमान सेवा देणारी पहिली विमान कंपनी होती॰[२]

कंपनी कामकाज[संपादन]

या विमान कंपनीचे मुख्य कार्यालय माद्रिद येथील MV49 बिजनेस पार्क येथे होते.[३] पुढील काळात हे कार्यालय आर्थिक नियोजनासाठी व बचतीसाठी माद्रिद मधील सलामांका जिल्ह्यात कंपोस वेलझ्कुएज येथे हलविले.[४]

मालकी[संपादन]

दि.३ एप्रिल २००१ रोजी या कंपनीचे खाजगीकरण झाले आणि माद्रिद शेअर बाजारात IBEX35 ने नोंदणी झाली. मुख्यत्वे खाजा माद्रिद – २३.४५%, ब्रिटिश एयर वेज – १३.२०%, SEPI- ५.२०%, EI कोरते ङ्गलेस – २.९०%, हे या विमान कंपनीचे भाग धारक होते. पुढील काळात ब्रिटिश एयर वेजचे भाग वाढले. इरेबियाचे भाग १०% पर्यंत झाले. त्यानंतर ब्रिटिश एयर वेज आणि आयबेरीयाचे एकत्रीकरण झाले आणि पुढे आंतरराष्ट्रीय एयर लाइन ग्रुप मध्ये ब्रिटिश एयर वेजचे भाग ५५% आणि आयबेरीयाचे ४५% पर्यन्त पोहचले.

आगमन ठिकाणे[संपादन]

आयबेरीया विमान कंपनीने खालील विमान कंपनीशी कायदेशीर करार केलेले आहेत.[५]

 • एयर बर्लिन
 • एयर बालटिक
 • अमेरिकन एयर लाइन्स
 • अवियंका
 • बोलीवियना दे अवियकीओन
 • बलगेरिया एयर
 • ब्रिटिश एयर वेज
 • कोपा एयर लाइन्स
 • झेक एयर लाइन्स
 • ईआय अल
 • एवेळोप एयर लाइन्स
 • फिंनाइर
 • इंटर जेट
 • जपान एयर लाइन्स
 • ल्याटम ब्रासील
 • ल्याटम चिली
 • ल्याटम एक्वाडोर
 • मेरीडियाना
 • निकी
 • रोयल एयर मरोक
 • रोयल जोर्डनियन
 • एस एयर लाइन्स
 • टाका एयर लाइन्स
 • युक्रेन आंतरराष्ट्रीय लाइन्स
 • वुएलिंग

आसन व्यवस्था[संपादन]

विमानात व्यवसाय आणि किफायतशीर असी दोन प्रकारची आसन व्यवस्था आहे. विमानाच्या आकारमानानुसार सध्या व्यवसाय वर्गात तीन प्रकारची व्यवस्था केली जाते. सन २०१६ पासून एयर बस ए330-200 आणि ए330-300 व A340-600 मध्ये IEF सुविधा वैयक्तिक रित्या पुरविल्या जातात. विमानात गटे गौरमेट मार्फत आहार व्यवस्था पुरविली जाते.

व्यवसाय वर्ग[संपादन]

स्पॅनिश आंतरदेशीय आणि यूरोप मधील विमानात व्यवसाय वर्ग आहेत. या वर्गातील आसन व्यवस्था अगदी किफायतशीर वर्गासारखीच असते पण मधील B व E ही आसने खुली असतात. विमान तळावरील तपासणी,सुरक्षा,बोर्डिंग,सामान हलवाहलवी, इ. सुविधा खर्च प्रवाशी टीकेट मध्ये समाविष्ट असतो.[६]

किफायतशीर वर्ग[संपादन]

आयबेरीया विमान कंपनी खान पान व्यवस्थेसंबंधी साधारण अमेरिकन पद्द्तिकडे झुकलेली आहे. खाण्याच्या वस्तु त्यात अन्न,अल्पोप अहार, ड्रिंक्स, तुम्ही विमानात घेवू शकता. त्याला ते टू मेन्यू म्हणतात.[७]

घटना आणि अपघात[संपादन]

या विमान कंपनीच्या सन १९३९ ते सन २०१६ पर्यन्त साधारण ४१ घटना घडलेल्या आहेत. त्यात हाईजॅक, अपघात यांचा समावेश आहे.

 1. ^ "कंपनी ऑफ़ सब्सिडीजेड एयरलाइन्स एस.ए".
 2. ^ "आयबेरीया एयर लाइन कनेक्टिविटी एंड फ्लीट इनफार्मेशन".
 3. ^ "आयबेरीया मूव्स फ्रॉम हेडकार्टर्स टू अ "सिग्निफिकेन्ट कॉस्ट सेविंग्स"".
 4. ^ "आयबेरीया एयर लाइन लीगल इनफार्मेशन".
 5. ^ "प्रोफाइल ऑन आयबेरीया एयर लाइन".
 6. ^ "आयबेरीया एयर लाइन-बिज़नेस क्लास".
 7. ^ "आयबेरीया एयर लाइन - टू मेन्यू" (PDF).