आननी फिरकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नमुनेदार आननी फिरक (अंगुली फिरक) मिळालेला चेंडू. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या संदर्भात. डावखुऱ्या फलंदाजासाठी हाच चेंडू पृष्ठीय फिरक मिळालेला गणला जाईल.

आननी फिरकी हा क्रिकेटमधील गोलंदाजीचा एक प्रकार आहे. या गोलंदाजीला आंतरफिरकी किंवा उजवी फिरकी अशी पर्यायी नावे आहेत.[१] या प्रकारात उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज त्याच्या बोटांचा व/वा मनगटाचा वापर करून चेंडूला उजव्या हाताच्या फलंदाजाच्या आननी क्षेत्रापासून पृष्ठीय क्षेत्राकडे फिरक देतो. याचा अर्थ टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाकडे किंवा डाव्या हाताच्या फलंदाजापासून दूर जातो. पृष्ठीय फिरकीमध्ये चेंडू पृष्ठीय क्षेत्राकडून आननी क्षेत्राकडे फिरक घेतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ बाळ ज. पंडित, मराठी विश्वकोश, खंड ४, पृष्ठ ४५६