Jump to content

फिरकी गोलंदाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्पिन गोलंदाजी या पानावरून पुनर्निर्देशित)

फिरकी गोलंदाज क्रिकेटच्या खेळातील गोलंदाजांचा प्रकार आहे. हे गोलंदाज सहसा मंदगतीने (साधारणतः ७०-९० किमी/तास) चेंडू टाकतात व चेंडू टाकताना चेंडूला फिरकी देतात. यामुळे टप्पा पडल्यावर चेंडू आपल्या हवेतल्या दिशेपेक्षा वेगळ्या दिशेला वळतो.

फिरकी गोलंदाजांचे दोन मुख्य प्रकार आहेत --

  • बोटे फिरकी गोलंदाज - हे गोलंदाज चेंडू टाकताना बोटांनी चेंडूला फिरकी देतात.
  • मनगटे फिरकी गोलंदाज - हे गोलंदाज चेंडू टाकताना मनगटाला झटका देतात व त्याद्वारे चेंडूला फिरकी देतात.