Jump to content

शमी विघ्नेश (आदासा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आदासा या पानावरून पुनर्निर्देशित)

आदासा हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव तेथील गणेशमंदिरामुळे नावाजलेले आहे. नागपूर शहरापासून आदासा मंदिर नागपूर ते कळमेश्वर महामार्गावर असून अंदाजे ४० किमी.अंतरावर आहे.नागपूर - छिंदवाडा लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आदासा हे क्षेत्र आहे. एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर आहे. ही मूर्ती नृत्यगणेशाची आहे, असे अभ्यासक सांगतात. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्याने त्या तीनही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे अदोष क्षेत्र. गणेशाच्या २१ स्थानांपकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. येथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो.

मंदिर टेकडीवर वसलेले असल्याने तेथून आजूबाजूचा परिसर नयनरम्य दिसतो. मंदिरात गणेशाची देखणी अशी भव्य स्वयंभू गणेश मुर्ती आहे.

आदासा येथील गणेशाचे दर्शन घेण्याकरिता हजारो भाविक येथे रोज येतात.

श्री विघ्नेशाचे मंदिर

[संपादन]

विदर्भातील अष्टविनायकांपैकी हे स्थान प्रथम क्रमांकावर आहे [ संदर्भ हवा ]. येथे टेकडीवरील गणेशमंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीला ' शमी विघ्नेश ' म्हणतात. ती महाराष्ट्रातील सर्वांत उंच गणेशमूर्ती आहे [] ही जवळपास ६ मीटर उंच आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती वाटते. येथील शंकराच्या मंदिरात असलेली पिंड दक्षिणाभिमुख आहे. इतर पिंडी उत्तराभिमुख असतात. गणेश पुराणात वर्णन केलेल्या मूर्तीपैकी ही एक आहे.[ संदर्भ हवा ] येथील गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ तरुण भारत,नागपूर.[permanent dead link]
विदर्भातील अष्टविनायक
श्री विघ्नेश (आदासा)चिंतामणी (कळंब)सिद्धीविनायक (केळझर)सर्वतोभद्र (पवनी)वरदविनायक (भद्रावती)भृशुंड (मेंढा)अष्टदशभूज (रामटेक)टेकडी गणपती (नागपूर)

वर:गणपती