Jump to content

असामोआह ग्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
असामोआह ग्यान

असामोआह ग्यान (Asamoah Gyan; २२ नोव्हेंबर, १९८५ (1985-11-22), आक्रा) हा घाना देशाचा एक फुटबॉलपटू आहे. २००३ पासून घाना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला ग्यान २००६, २०१०२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये घानाकडून खेळला आहे.

क्लब पातळीवर ग्यान २००३-०८ दरम्यान इटलीच्या सेरी आमधील उदिनेस काल्सियो, २००८-१० दरम्यान फ्रान्सच्या लीग १ मधील स्ताद ऱ्हेन एफ.सी., २०१०-१२ दरम्यान प्रीमियर लीगमधील संडरलॅंड ए.एफ.सी. तर २०१२ पासून संयुक्त अरब अमिरातीच्या अल ऐन ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

[संपादन]