Jump to content

अलेजियंट एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेजियंट एर
आय.ए.टी.ए.
G4
आय.सी.ए.ओ.
AAY
कॉलसाईन
अलेजियंट
स्थापना इ.स. १९९७ (वेस्टजेट नावाने)
हब लास व्हेगस, लॉस एंजेल्स, ओरलॅंडो, ओकलंड, मर्टल बीच, फोर्ट लॉडरडेल, पंटा गोर्डा (फ्लो), सेंट पीटर्सबर्ग-क्लियरवॉटर, पिट्सबर्ग, फीनिक्स-मेसा, सिनसिनाटी
विमान संख्या ८४
ब्रीदवाक्य ट्रॅव्हल इज अवर डील
पालक कंपनी अलेजियंट ट्रॅव्हल कंपनी
मुख्यालय एन्टरप्राइझ, नेव्हाडा
प्रमुख व्यक्ती मॉरिस जे. गॅलाघर (मुख्याधिकारी)
संकेतस्थळ [www.allegiant.com अलेजियंट.कॉम]

अलेजियंट एर ही एक अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. अलेजियंट ट्रॅव्हल कंपनीच्या या उपकंपनीचे मुख्यालय लास व्हेगस जवळील एन्टरप्राइझ शहरात असून हिचे तळ लास व्हेगस, लॉस एंजेल्सओरलॅंडोसह ११ शहरांतून आहेत.

पूर्णपणे अलेजियंट ट्रॅव्हल कंपनीच्या मालकीच्या या विमानकंपनीची स्थापना १९९७ मध्ये झाली. ही एक सार्वजनिकरित्या व्यवहार होणारी कंपनी असून २०१६ च्या सुमारास यात ५,६०० कर्मचारी होते आणि २.६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त बाजार भांडवल होते.[] ही विमान कंपनी उत्तर अमेरिकेतील चौदावी सर्वात मोठी विमान कंपनी आहे.

गंतव्यस्थाने

[संपादन]

डिसेंबर २०२१ च्या सुमारास अलेजियंट अमेरिकेतील १३३[] शहरांना विमानसेवा पुरवते. अलेजियंटचा भर मोठ्या विमानतळांऐवजी लहान प्रादेशिक विमानतळांवर असतो. सहसा आठवड्यातून फक्त काही वेळाच विमाने जातात. अपेक्षित खर्च आणि महसूल यांचा हिशोब केल्यानंतरच ही कंपनी आपले मार्ग निवडते आणि मागणीनुसार ठराविक ठिकाणची विमान सेवा सुरू किंवा बंद करते.

प्रमुख देशांतर्गत गंतव्यस्थाने

[संपादन]
अलेजियंट एरची देशांतर्गत प्रमुख गंतव्यस्थाने (सप्टेंबर २०२४ - ऑगस्ट २०२५)[]
क्र. विमानतळ प्रवासी वाटा
ओर्लँडो-सॅनफोर्ड, फ्लोरिडा १४,८६,२८० १००.००%
सेंट पीटर्सबर्ग/क्लियरवॉटर, फ्लोरिडा १३,०४,९५० ९९.५०%
पुंटा गोर्डा-फोर्ट मायर्स, फ्लोरिडा १०,९०,८२० ९९.५४%
फिनिक्स-मेसा, ॲरिझोना १०,४१,१५० ९८.०७%
लास वेगास, नेव्हाडा ९,७२,८५० ३.८३%

विमानताफा

[संपादन]
विमानाचा आतला भाग

ऑगस्ट २०२५ च्या सुमारास अलेजियंट एरकडे खाली विमाने होती:[]

विमान सेवेत मागणी प्रवासी नोंदी
वाय+ वाय एकूण
एरबस ए३१९-१०० ३१ १८ १३८ १५६
एरबस ए३२०-२०० १८ १५९ १७७ सेवानिवृत्तीच्या मार्गावर.[]
७५ १६८ १८६
बोईंग ७३७ मॅक्स ७ २४ ठरले नाही आणखी ८० विमाने मागवू शकते.[][]
२०२७ पर्यंत वितरण केले जाणार.
बोईंग ७३७ मॅक्स २०० १६ १० २१ १६९ १९०[]
एकूण १३१ ३४

निवृत्त ताफा

[संपादन]

अलेजियंट एरने यापूर्वी खालील प्रकारची विमाने चालवली आहेत:

विमान एकूण ताफ्यात सामील ताफ्यातून निवृत्त बदली विमान नोंदी
बोईंग ७५७-२०० २०१० २०१७ एरबस ए३२० कुटुंब []
मॅकडोनेल डग्लस एमडी-८० ६१ २००१ २०१८ एरबस ए३२० कुटुंब एमडी-८१, एमडी-८२, एमडी-८३, एमडी-८७ आणि एमडी-८८ प्रकारांचा समावेश.[१०]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Allegiant Travel Company Stock Quote & Summary Data". NASDAQ. September 24, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 22, 2016 रोजी पाहिले.
  2. "अलेजियंट ट्रॅव्हल कंपनी चौथ्या तिमाहीचे आणि पूर्ण वर्ष २०२१ चे आर्थिक निकाल". अलेजियंट एर. अलेजियंट ट्रॅव्हल कंपनी. May 27, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 19, 2022 रोजी पाहिले.
  3. "विमान वाहतूक आकडेवारीची विचारणा". April 10, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 14, 2023 रोजी पाहिले.
  4. "व्यावसायिक". www.boeing.com (इंग्रजी भाषेत). २०२५-०८-०७ रोजी पाहिले.
  5. "अमेरिकेतील अलेजियंट एरने ७ च्या ऐवजी अधिक बी७३७-८-२०० विमानांची निवड केली". Ch-Aviation. ऑक्टोबर १०, २०२३. ऑक्टोबर १६, २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी पाहिले.
  6. "अलेजियंटने ८९ दशलक्ष डॉलरचा दुसऱ्या तिमाहीचा नफा नोंदवला, ७३७ मॅक्सच्या वितरणास उशीर झाल्याची माहिती". FlightGlobal. २ ऑगस्ट २०२३. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ४ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  7. "अमेरिकेतील अलेजियंट एरने ५० पेक्षा जास्त बोईंग ७३७ मॅक्स विमानांची मागणी नोंदवली". Ch-Aviation. ५ जानेवारी २०२२. ६ जानेवारी २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  8. फिलपॉट, लोर्न (२०२४-०२-१२). "अलेजियंट एरचे नवीन बोईंग ७३७-८-२०० नियोजित मार्ग". Airways (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी २०२४ रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.
  9. "अलेजियंट एरने बोईंग ७५७ ताफ्यातून निवृत्त केले". Ch-Aviation (इंग्रजी भाषेत). ऑगस्ट ७, २०२५ रोजी पाहिले.
  10. "अलेजियंट एरने एमडी-८० विमानांना निरोप दिला". FlightGlobal (इंग्रजी भाषेत). ऑगस्ट ७, २०२५ रोजी पाहिले.