अलेजियंट एर ही एक अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. अलेजियंट ट्रॅव्हल कंपनीच्या या उपकंपनीचे मुख्यालय लास व्हेगस जवळील एन्टरप्राइझ शहरात असून हिचे तळ लास व्हेगस, लॉस एंजेल्स व ओरलॅंडोसह ११ शहरांतून आहेत. १,८०० कर्मचारी असलेल्या या कंपनीची आवक १.४ अब्ज अमेरिकन डॉलर असून तीस ८ कोटी ६७ लाख डॉलर निव्वळ नफा झाला (२०१४.)