अरक्कोणम
Appearance
(अर्कोणम या पानावरून पुनर्निर्देशित)
अरक्कोणम அரக்கோணம் |
|
भारतामधील शहर | |
अरक्कोणम रेल्वे स्थानक |
|
देश | भारत |
राज्य | तमिळनाडू |
जिल्हा | वेल्लोर जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ७८,३९५ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
अरक्कोणम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या वेल्लोर जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. अरक्कोणम शहर तमिळनाडूच्या उत्तर भागात चेन्नईपासून ६९ किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली अरक्कोणमची लोकसंख्या ७८ हजार होती. येथे भारतीय नौसेनेचा एक प्रमुख तळ आहे.
अरक्कोणम मुंबई-चेन्नई व बंगळूर-चेन्नई रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातून चेन्नईकडे धावणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या येथूनच जातात. चेन्नई उपनगरी रेल्वेचा पश्चिम मार्ग अरक्कोणममार्गे जोलारपेटपर्यंत धावतो.