Jump to content

अमृता शेरगिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमृता शेरगिल

अमृता शेरगिल (३० जानेवारी, १९१३ - ५ डिसेंबर, १९४१[]) ही भारतीय महिला चित्रकार होती. तिचा जन्म बुडापेस्ट, हंगेरी येथे झाला. तिचे वडील उमराव सिंह शेरगिल हे संस्कृत-फारसीचे विद्वान आणि उच्च सरकारी अधिकारी होते; तर आई मेरी ॲंटनी गोट्समन ही हंगेरीतील ज्यू ऑपेरा गायिका होती.

अमृता कला, संगीत व अभिनय यांची उत्तम जाणकार होती. केवळ आठव्या वर्षी तिला उत्तम पियानोवादन येत होते. विसाव्या शतकातील या प्रतिभावान कलाकर्तीचा समावेश भारतीय पुरातात्विक सर्वेक्षण खात्याने १९७६ आणि १९७९ मध्ये भारतातील नऊ सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये केला आहे. तिचे चित्रे त्याकाळातील अतिशय महागडी चित्रे होती.[]. शाळेत असताना वर्गात तिने 'नग्नचित्र' (न्यूड) रेखाटल्यामुळे तिची हकालपट्टी करण्यात आली. [] तिचे कलागुण पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला फ्लॉरेन्स, इटली येथे कला शिक्षणासाठी दाखल केले.

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ The Tribune India, http://www.tribuneindia.com/2000/20000312/spectrum/main2.htm#3, ३० जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ http://ia.rediff.com/money/2007/dec/29art.htm
  3. ^ The Tribune India, http://www.tribuneindia.com/2000/20000312/spectrum/main2.htm#3, ३० जानेवारी २०१६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]