अभिलेखागार
Appearance
ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात,त्या ठिकाणास " अभिलेखागार " असे म्हणतात. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे,दप्तरे,जुनी चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरीत करता येतो.
भारताच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे.भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे.[१]
- ^ Archives in India
[[ वर्ग: प्रशासकीय विभाग ]]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |