अनिता रेड्डी
अनिता रेड्डी | |
---|---|
जन्म | चेन्नई, तमिळनाडू, भारत |
पेशा | सामाजिक कार्यकर्त्या |
अपत्ये | ३, रामा रेडी सहित |
पुरस्कार |
पद्मश्री महिला साधकी पुरस्कार जीन हॅरिस पुरस्कार महिला अचीवर पुरस्कार नम्मा बेंगळुरू पुरस्कार PRSI पुरस्कार केम्पेगौडा पुरस्कार आजीवन अचिव्हमेंट पुरस्कार -ताना |
अनिता रेड्डी या कर्नाटकातील एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि असोसिएशन फॉर व्हॉलेंटरी ॲक्शन अँड सर्व्हिसेस (एव्हीएएस) च्या संस्थापिका आहेत.[१][२] कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसन आणि उत्थानासाठी केलेल्या त्यांच्या सेवांसाठी ओळखल्या जातात.[३] त्या द्वारका आणि ड्रिक फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या उपजीविकेसाठी काम करतात. भारत सरकारने २०११ मध्ये पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने अनिता रेड्डी यांना सन्मानित केले.[४]
चरित्र
[संपादन]बेंगळुरूच्या झोपडपट्ट्यांमधील त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवांबद्दल म्हणतात "मला भूमाफिया आणि निहित स्वार्थ असलेल्या व्यक्तींचा सामना करावा लागला. एकदा, सुमारे ३०० लोकांच्या जमावाने माझा पाठलाग केला. मला स्मशानभूमीतील झोपडपट्टीवासीयांसोबत बैठका घ्यायला शिकावे लागले."
अनिता रेड्डी यांचा जन्म तामिळनाडूच्या चेन्नई येथे रंजिनी रेड्डी आणि उद्योगपती आणि परोपकारी व्यक्ती द्वारकनाथ रेड्डी यांच्या श्रीमंत कुटुंबात झाला.[५] त्यांचे शालेय शिक्षण आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली स्कूल आणि डब्ल्यूसीसी मधील महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गेल्या. नंतर त्यांनी त्यांचा बालपणीचा मित्र, प्रताप रेड्डी, कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री के. चेंगलराया रेड्डी यांचा मुलगा, यांच्याशी लग्न केले.[५]
त्यांची सामाजिक कारकीर्द १९७० च्या उत्तरार्धात सुरू झाली. त्यांनी झोपडपट्टीतील रहिवाशांसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी १९८० मध्ये असोसिएशन फॉर व्हॉलेंटरी ॲक्शन अँड सर्व्हिसेस (एव्हीएएस) ची स्थापना केली.[३] त्यांचा पहिला उपक्रम झोपडपट्टीतील राहणीमानात सुधारणा करून घरांच्या सुविधांचे पुनर्निर्माण करून योगदान देणे हा होता.[५] स.न. १९९६ मध्ये जेव्हा त्यांच्या वडिलांनी द्वारकानाथ रेड्डी रामनर्पणम ट्रस्ट (डीआराअरटी) ची स्थापना केली, तेव्हा अनिता रेड्डींच्या कामाला वेग आला.[१][२] त्यांच्या वडीलांनी ट्रस्टला संपत्ती बहाल केली आणि अनिता यांना ती ट्रस्ट सांभाळण्यास सांगितली.[३] अतिरिक्त संसाधनांसह, अनिता रेड्डी यांनी गरीब लोकांच्या सक्षमीकरणासाठी आणि झोपडपट्ट्यांमध्ये चांगल्या सुविधा उभारण्यासाठी काम केले.[५]
अनिता रेड्डी यांना दिले जाणारे आणखी एक यश म्हणजे त्यांनी केलेल्या कलाकारी कला (द्वारका) मधील विणकर आणि ग्रामीण कारागीरांच्या विकासासाठीची मदत. कलामकारी ही कला मरणाच्या दारात उभी आहे. या कलेला पुनरुज्जीवन करणे आणि कारागीरांना त्यांच्या उत्पादनांची साठवण आणि विपणन करण्यासाठी मदत करण्याचे काम् त्यांच्या संस्थेने केले आहे.[५] अनिता रेड्डींच्या पुढील प्रकल्पासाठी द्वारकानाथ रेड्डी इन्स्टिट्यूट्स फॉर नॉलेज (डीआरआयके) अंतर्गत नेतृत्व विकास संस्था स्थापन करण्याची योजना आहे. ज्यासाठी त्यांनी चिकबल्लापूर येथे ४० एकर जागेची व्यवस्था केली आहे. या जागेला ड्रिक विवेका कॅम्पस म्हणतात. संस्था डीआरआयके - जीवनोत्सव नावाच्या सांस्कृतिक सक्षमीकरण नेटवर्क अंतर्गत गरीबांसाठी नाट्य, संगीत, क्रीडा, कला आणि हस्तकला आणि गांधीवादी अभ्यासाला प्रोत्साहन देते.[५][६]
अनिता रेड्डी यांनी भारत सरकारचे प्रतिनिधित्व अधिवास दुसरा, युनायटेड नेशन्स इस्तंबूल येथे केले. ही परिषद, तुर्की येथे ३ ते १४ जून १९९६ [३] च्या दरम्यान झाली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत द शेल्टरलेस वर्ष या मोहिमेचा एक भाग म्हणून केन्या मध्येआयोजित केली होती.[७] त्या कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या गृहनिर्माण कार्य दलाबरोबर काम करतात. यात शहरी भागातील गरीबांसाठीच्या घरांचा अहवाल सादर केला जातो.[७] त्या कर्नाटक झोपडपट्टी मंजूरी मंडळाची सदस्या होत्या. त्या रंजिनी द्वारकानाथ रेड्डी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत.[६] सर्वोदय संस्थेच्या कर्नाटक भागातून विश्वस्त आहेत.[७][८]
अनिता रेड्डी या जीवनोत्सव संस्थेला प्रोत्साहन देतात. हे एक संस्कृतिक व्यासपीठ आहे. तसेच के.सी रेड्डी जलतरण केंद्रालाही त्या प्रोत्साहन देतात, या केंद्राने राष्ट्रीय स्तरावर जलतरणपटू तयार केले आहेत, त्यातील काही महत्वाची नावे निशा बाजरी आणि मेघना नारायणन ही आहेत.[९] त्या महिला आवाज संयोजन सचिव म्हणून आणि राज्य पातळीवरील सचिव म्हणून झोपडपट्टी निवासी फेडरेशन (केकेएनएसएस) येथे काम करतात.[७] ही संस्था शाळेवर आधारित मोहिमा आणि संवाद सभा आयोजित करते.[१०]
त्यांच्या सध्याच्या भूमिकेत त्या एआरसी - कला, अधिकार आणि समुदायाची स्थापना करण्याच्या कल्पनेला चालना देत आहेत. जे सरकारी शाळांसह अनेक समाजातील गरीब मुलांमध्ये स्वदेशी परंपरा आणि स्वदेशी वारसा यांबद्दल ज्ञान वाढविणारे पहिले शिक्षण केंद्र आहे. हे युवकांना तेथे राहत असलेल्या क्षेत्रातील अंतर्निहित सामर्थ्य आणि प्रदेशांच्या विकासासाठी संबंधित इतिहासाची संपत्ती शोधण्यास सक्षम करते.
पुरस्कार आणि मान्यता
[संपादन]अनिता रेड्डी यांना १९९७ मध्ये गिल्ड ऑफ वुमन अचीवर्सचा महिला साधकी पुरस्कार मिळाला आहे.[७][११] तसेच जीन हॅरिस पुरस्कार आणि लेडीज सर्कल इंडिया कडून वुमन अचीव्हर पुरस्कार त्यांना २०१० - २०११ मध्ये मिळाला. नम्मा बेंगळुरू फाउंडेशनने वर्षातील सर्वोत्तम व्यक्ती म्हणून घोषित केले.[७][१२] त्याच वर्षी, २०११ मध्ये, अनिता रेड्डी यांना चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार पद्मश्री मिळाला.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Association for Voluntary Action and Service report". Association for Voluntary Action and Service. 2014. 20 November 2014 रोजी पाहिले.
- ^ a b "Presentation by Anita Reddy". Video. Story Pick. 2014. 20 November 2014 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Chai with Manjula". Chai with Manjula. June 2010. 2018-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 November 2014 रोजी पाहिले.
- ^ a b "Padma Shri" (PDF). Padma Shri. 2014. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 11 November 2014 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f Chitra Ramani (25 September 2011). "The Hindu". 20 November 2014 रोजी पाहिले.
- ^ a b "Kavitha". Kavitha. 2014. 2018-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 November 2014 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f "Bay Area Desi". Bay Area Desi. 2011. 29 November 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Interview". YouTube. 10 April 2012. 20 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Swim Gala". Swim Gala. 2014. 20 November 2014 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Aditi". Aditi. 2014. 2014-11-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Rotary". 4 November 2011. 20 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Deccan Herald". 9 February 2011. 20 November 2014 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- "Presentation by Anita Reddy". Video. Story Pick. 2014. 20 November 2014 रोजी पाहिले.
- "Chai with Manjula". Chai with Manjula. June 2010. 2018-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 November 2014 रोजी पाहिले.
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from September 2024
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- २०व्या शतकातील महिला शिक्षिका
- २०व्या शतकातील भारतीय महिला
- २०व्या शतकातील भारतीय शिक्षक
- भारतीय परोपकारी
- भारतीय महिला परोपकारी
- हयात व्यक्ती
- सामाजिक कार्यातील पद्मश्री पुरस्कारविजेते
- सामाजिक कार्यकर्ते
- चेन्नईमधील विद्वान
- तमिळनाडूतील महिला शिक्षिका
- तमिळनाडूतील शिक्षक
- तमिळनाडूतील सामाजिक कार्यकर्ते