Jump to content

अनिता गुहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Anita Guha (es); અનિતા ગુહા (gu); Anita Guha (ast); Anita Guha (ca); Anita Guha (de); Anita Guha (ga); Anita Guha (da); انیتا گہا (pnb); انیتا گہا (ur); Anita Guha (tet); Anita Guha (sv); Anita Guha (ace); अनीता गुहा (hi); అనితా గుహ (te); Anita Guha (fi); অনিতা গুহ (as); Anita Guha (map-bms); அனிதா குகா (ta); অনিতা গুহ (bn); Anita Guha (fr); Anita Guha (jv); अनिता गुहा (mr); Anita Guha (pt); Anita Guha (bjn); Anita Guha (sl); Anita Guha (min); Anita Guha (pt-br); Anita Guha (su); Anita Guha (id); Anita Guha (nn); Anita Guha (nb); Anita Guha (nl); Anita Guha (bug); Anita Guha (gor); Анита Гуха (ru); Anita Guha (uz); Anita Guha (en); أنيتا غوها (ar); ᱚᱱᱤᱛᱟ ᱜᱩᱦᱚ (sat); ਅਨੀਤਾ ਗੁਹਾ (pa) actriz india (es); ભારતીય અભિનેત્રી (gu); aktore indiarra (eu); actriz india (1932–2007) (ast); индийская актриса (ru); actores a aned yn 1939 (cy); Indian actress (en-gb); بازیگر هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); بھارتی فلمی اداکارہ (ur); indisk skådespelare (sv); індійська акторка (uk); भारतीय अभिनेत्री (hi); intialainen näyttelijä (fi); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); भारतीय अभिनेत्री (mr); actriz indiana (pt); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); indisk skuespiller (nb); Indiaas acteur (-2007) (nl); Indian actress (en); שחקנית הודית (he); ഇന്ത്യന്‍ ചലച്ചിത്ര അഭിനേത്രി (ml); actriz india (gl); ممثلة هندية (ar); actriu índia (ca); ban-aisteoir Indiach (ga)
अनिता गुहा 
भारतीय अभिनेत्री
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी १७, इ.स. १९३९
मृत्यू तारीखजून २०, इ.स. २००७
मुंबई
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९५३
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अनिता गुहा (१७ जानेवारी १९३९ - २० जून २००७) एक भारतीय अभिनेत्री होत्या ज्यानी सहसा चित्रपटांमध्ये पौराणिक पात्रे साकारली होती. १९७५ च्या जय संतोषी माँ चित्रपटामध्ये संतोषी माताची मुख्य भूमिका साकारण्यासाठी त्या ओळखल्या गेल्या. यापूर्वी त्यांनी इतर पौराणिक चित्रपटांमध्ये सीतेची भूमिका केली होती; संपूर्ण रामायण (१९६१), श्री राम भरत मिलाप (१९६५) आणि तुलसी विवाह (१९७१). याशिवाय त्यांनी गुंज उठी शहनाई (१९५९), पूर्णिमा (१९६५), प्यार की राहें (१९५९), गेटवे ऑफ इंडिया (१९५७), देख कबीरा रोया (१९५७), लुकोचुरी (१९५८) आणि संजोग (१९६१) यांसारख्या पौराणिक कथांवर आधारीत नसलेल्या चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या.

कारकीर्द

[संपादन]

१९५० च्या दशकात, त्या १५ वर्षांच्या असताना एका सौंदर्य स्पर्धा स्पर्धक म्हणून त्या मुंबईत आल्या होत्या. [] त्या तिथे अभिनेत्री बनल्या आणि टोंगा-वाली (१९५५) मधून हिंदी चित्रपटात पदार्पण केले. त्याआधी त्यांनी एका बंगाली चित्रपटात लहान भूमीका केली होती. त्यांनी देख कबीरा रोया (१९५७), शारदा (१९५७) आणि गूंज उठी शहनाई (१९५९) सारख्या हिट चित्रपटांकडे वाटचाल केली.[] गूंज उठी शहनाईसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीसाठी फिल्मफेअर पुरस्कारात नामांकन मिळवले. हे त्यांच्या कारकीर्दीतील एकमेव पुरस्काराचे नामांकन होते.[] १९६१ मध्ये, त्या बाबूभाई मिस्त्रींच्या संपूर्ण रामायणमध्ये सीतेच्या रूपात दिसल्या, ज्यामुळे त्यांचे घराघरात नाव झाले.[]

पण जय संतोषी माँ (१९७५) मधील त्यांच्या मुख्य भूमिकेने त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून दिली.[] त्यांनी ही भूमिका घेईपर्यंत संतोषी देवीबद्दल कधीच ऐकले नव्हते, कारण ही अल्प-ज्ञात देवी होती. त्यांची ही फक्त पाहुण्या कलाकाराची भूमिका होती आणि त्यांचे भाग हे १०-१२ दिवसात शूट झाले. शूटिंगदरम्यान त्यांनी श्रद्धेने उपवास केला होता. ह्या कमी-गुंतवणूकीच्या चित्रपटाने आश्चर्यचकित केले आणि एक सांस्कृतिक घटना बनत असताना बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडले. संतोषी देवी आता एक प्रसिद्ध देवी बनली आणि संपूर्ण भारतातील स्त्रिया तिची पूजा करतात. लोकांनी जय संतोषी माँ दाखवणाऱ्या चित्रपटगृहांमध्ये मंदिरासारखे अन्नाचा प्रसाद आणले व दारात चपला काढल्या. गुहा यांनी असा दावा केला की लोक आशीर्वाद घेण्यासाठी तिच्याकडे आले, कारण त्यांना ती खरी देवी असल्याचे वाटत असे. तथापि, त्या देवी कालीच्या भक्त असल्याचा दावा करून त्या कधीही संतोषी देवीच्या भक्त नाही बनल्या.

त्यांनी अभिनय केलेल्या इतर पौराणिक चित्रपटांमध्ये कवी कालिदास (१९५९), जय द्वारकादेश (१९७७) आणि कृष्णा कृष्णा (१९८६) यांचा समावेश होतो. पौराणिक अभिनेत्री म्हणून त्या प्रचलीत झाल्या याचा त्यांना आनंद नव्हता, कारण अभिनयाच्या इतर भूमीका त्यांच्या वाट्याला येणे बंद झाले. त्यांच्या आधीच्या कामांमध्ये संगीत सम्राट तानसेन (१९६२), कण कण में भगवान (१९६३) आणि वीर भीमसेन (१९६४) या कालखंडातील चित्रपटांचा समावेश आहे. आराधना (१९६९) मध्ये त्यांनी राजेश खन्नाच्या दत्तक आईची भूमिका केली होती.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

अनिता गुहांचा विवाह अभिनेता माणिक दत्तशी झाला होता. त्यांना मुले नव्हती. त्यांनी नंतर एक मुलगी दत्तक घेतली. त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर, त्या मुंबईत एकट्या राहिल्या व २० जून २००७ रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अनिता गुहा या अभिनेते प्रेमा नारायण यांच्या मावशी आहेत. प्रेमा ही तिची बहीण अनुराधा गुहा यांची मुलगी आहे. प्रेमा ह्या अमानुष (१९७५) चित्रपटात दिसल्या व ज्यासाठी त्यांना पण सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीसाठी फिल्मफेअर पुरस्कारात नामांकन मिळाले होते.

फिल्मोग्राफी

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमीका
१९५३ बन्शेर केला
१९५५ टोंगा-वाली
दुनीया गोल हैं दिया कुमारी
१९५६ यहुदी की बेटी
आंख का नशा आशा
चिरकुमार सभा
छु मंतर रत्नावली
१९५७ हर्जीत
उस्ताद सौ. रोजी
शारदा पद्मा
पवन पुत्र हनुमान
गेटवे ऑफ इंडिया किशोरची प्रियकर
एक झलक
देख कबीरा रोया रेखा
१९५८ कल क्या होगा
लुकोछोरी
स्टॅन्ड
माया बाजार सुरेखा
फरिश्ता बग्गाची मुलगी
भला आदमी
१९५९ टिपू सुल्तान
सम्राट पृथ्वीराज चौहान कर्नाटकी नर्तकी
महारानी पद्मीनी
प्यार की राहे
कवी कालिदास पुष्पावली
गुंज उठी शहनाई रामकली
चाचा जिंदाबाद रेणू
१९६० रिक्षावाला
मूड मूड के ना देख अनिता सिंह
अंगुलीमाल गुरू माता
१९६१ संजोग लाली
संपुर्ण रामायण सीता
१९६२ संगीत सम्राट तानसेन हंसा
१९६३ नाग ज्योती
कण कण में भगवान रूपा
देव कन्या
१९६४ वीर भिमसेन
रूप सुंदरी
महासती अनुसया
१९६५ शाही रक्षा
संत तुकाराम
श्रीराम भरत मिलन सीता
शंकर सीता अनुसया सीता
सती नारी मालावती
पुर्णीमा वंदना मेहरा
महाराजा विक्रम
जहां सती वहां भगवान मंदाकिनी
१९६६ लव कुश
१९६९ हनुमान चालिसा
आराधना सुरजची सावत्र आई
सती सुलोचना सुलोचना
१९७१ तुलसी विवाह लक्ष्मी
१९७२ अनुराग राजेशची आई
१९७३ झुम उठा आकाश
गरिबी हाटाओ
१९७४ जब अंधेरा होता है मनोरमा भारद्वाज
१९७५ महापावन तिर्थ यात्रा
जय संतोषी माँ संतोषी देवी
बिवी किराये की
बदनाम
१९७६ लडकी भोली भाली राजूची आई
नागीन सुनीताची बहीण
जय महालक्ष्मी माँ
दो खिलाडी ममता सिंह
१९७७ आनंद आश्रम चंद्रमुखी
सोलह शुक्रवार कौशल्या
जय द्वारकाधीश रेवती
जय अंबे माँ
१९७८ तुम्हारे लिये शिला
१९७९ गुरू हो जा शुरू शिलाची आई
१९८१ संपुर्ण संतोषी माँ की महिमा
फिफ्टी फिफ्टी रानी मा
१९८३ नवरात्री
सती नाग कन्या सती अनसूया
१९८४ प्रार्थना
१९८६ कृष्णा-कृष्णा रेवती
१९८९ सोचा ना था
१९९१ लखपती रंभा

नामांकन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Santoshi Maa Anita Guha dead". द टाइम्स ऑफ इंडिया. 20 June 2007. 26 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "Anita Guha, 70s, actress – Entertainment News, Obituary, Media – Variety". Variety. 9 July 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 April 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "1st Filmfare Awards 1953" (PDF). 12 June 2009 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 December 2007 रोजी पाहिले.
  4. ^ "Anita Guha dead". The Hindu. Chennai, India. 20 June 2007. 25 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 December 2012 रोजी पाहिले.
  5. ^ Kahlon, Sukhpreet. "Anita Guha, a different 'Maa' in Indian cinema – Death anniversary special". Cinestaan.com. 25 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 June 2018 रोजी पाहिले.