Jump to content

अण्णा बाळा पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे पान अनाथ आहे.
ऑक्टोबर २०१२च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.


[ संदर्भ हवा ] [ व्यक्तिगतमत ]

इतिहास प्रसिद्ध सातारा जिल्हात कोयना नदीच्या तीरावर तांबवे हे गाव वसले आहे. व्यवसाय शेतीचा आहे. वयाच्या दहा-बारा वर्षाचा हा अण्णा बाळा सातव्या वर्गात शिकत होता. आणि त्याच वेळी देशात स्वातंत्ऱ्याची लाट सुरू झाली विदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशी कपडे वापरायचे. महात्मा गांधी की जय, चले जाव ह्या आरोळ्या त्याच्या कानावर पडु लागल्या अशीच काही वर्ष निघून गेली. आणि उच्च शिक्षणा साठी तो बाहेर गावी गेला. शिक्षण पूर्ण करून परत आल्यावर गावाने त्याला सरपंच केला ह्याच साल आहे इ.स. १९३७. सरपंच झाल्यावर त्यांनी गावाचा विकास सुरू केला नवीन योजना सुरू केल्या अण्णा बाळांची कारकीर्द सर्वानच्या मुखात अण्णा बाळा अण्णा बाळा होऊ लागला. लोकांनच कल्याण करण्यासाठी त्यांनच भल करण्यासाठी त्यांनी मल्टी परपस सोसायटी सुरू करण्याच ठरवल आणि अण्णा बाळानी सोसायटीचे मेंबर गोळा करायला सुरुवात केली. आणि पहिली मिटिंग कराडला भरविली गेली. ह्यात थोडा शाब्दिक वाद झाला अण्णा बाळानी सांगितल बहुजन समाजातील कुणालाही या सोसायटीच चेरमन करा. सोसायटी मध्ये अठरापगड जातीतील सर्वाना मेंबरशीप द्या. आजुबाजुच्या वाड्यांचा यात समावेश करा. परत आठ दिवसानी मिटींग घ्यायच ठरल. आपआपल्या ओळखिचे, नात्यातले, जिव्हाळ्याचे असे जो तो मेंबर गोळा करू लागला.

काशीनाथशेठ कराड वरून येणार आहेत त्यांची मंडळी वाट पहात उभी होती. संध्याकाळची वेळ आहे काशीनाथशेठच्या वाड्यावर जाऊन आले, चावडीवर जाऊन आले. डी.जी. पाटील, अण्णा बाळा ही मंडळी कोयना नदीच्या तीराला पाणवठ्यावर आलेली आहेत. बाज्या मांग बत्ती डोक्यावर घेऊन उभा आहे. कडुस पडलेली वेळ आहे. गावात कुठे तरी पाल चुकचुकली. जाणत्या लोकांच्या मनात नकळत संशय आला हे सोसायटीचे राजकारण गावात दोन गट तर करणार नाहीत ना भाऊबंदकीच भांडण तर सुरू हो़णार नाही. रामचंद्र पाटील, काशीनाथशेठचा ग्रुप एक वेगळ्या बाजुला होता.

नावाड्याने नाव पाण्यात टाकली नाव तीराला येताच काशीनाथशेठ नावेतुन खाली उतरला. बराच वेळ झाला आम्ही आपली वाट पहात होतो अस अण्णा बाळांनी विचारले. हो उशीर झाला. अशा चर्चा होत आहेत बोलता बोलता कोयना नदीचा काठ चढुन जात आहेत. इकडे अण्णा बाळा नदीत चुळ भरण्यासाठी गेलेला आहे आणि अण्णा नदीत चुळ भरतो एवढ्यात अण्णावरती सपासप तलवारीचे वार झाले. बाज्या मांग बघायला लागला आहे भितीने तो थरथर कापाया लागलेला आहे. एकच दंगा सुरू झाला. विष्णू बाळा हा अण्णा बाळाचा भाऊ, पहीलवान असणारा हा गडी घरात होता. त्याला कळल पाणवठ्यावर मारामारी झाली. तो पळत आलेला आहे. आर कोणी मारल माझ्या भावाला हिम्मत असेल तर या आता पुढे हा विष्णू बाळा आलेला आहे. एका एकाचा मुडदा पाडल्याशिवाय राणार नाय. आणि या विष्णू बाळाने विरोधकाच्या हातातील काठी घेतली आणि तो गरगर काठी फरवु लागला कोयना काठी रण पेटले अण्णाच्या बाजुने असणारा अजमुद्दीन त्याने ही काठी हातात घेतली आणि तो ही विरोधकांवर तुटून पडला. आणि विरोधक आडवे होऊ लागले. बंदुकिचे बार हवेत जात होते. एकाच्या हातात लायसंसची बंदुक होती पण चाप ओढण्याची त्याची छाती होत नव्हती. विष्णू बाळाने या बंदुकी जमा केल्या आणि तो ओरडला अर आज कुणालाबी सोडायचा नाय कसे पळतात तेच बघतो. एकाएकाच्या घराची वाट लावीन. आर काय करताय मी इकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलोय मरणाच्या वाटेवर आहे. कुणी काही करू नका आधी माझी सोय करा.विव्हळत नदिवर पडलेला अण्णा बाळा म्हणाला. विष्णू बाळा आणि अण्णा बाळाची चाहती मंडली पळत गेली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अण्णा बाळा विव्हळत पडला होता. तलवारीचे वार त्याने हातावर झेलले होते बोट तुटली होती पण ती अर्धवट होती. दंडावर जखमा झाल्या होत्या. सर्व गावाला हे कळल होत. हा हा म्हणता बातमी पसरली. अण्णा बाळाला घेतल पाळण्यात घातल त्या वेळेला हमरस्तावर जायला रस्ते असे की बैलगाडी ही जात नसे. पाळण्यातुन रस्त्यावर आणलेला आहे. चांदण्या रात्रीतुन शे दोनशे माणसांचा घोळका येत असलेला बघून काशीनाथशेठला घेऊन आलेला ड्रायवर घाबरून झाडावर चढुन बसला. झाडावर चढलेला एक माणुस यांना दिसला. कोण झाडावर चढुन बसलाय. हा काशीनाथशेठचा माणुस दिसतोय पाडा याला दगडाने खाली. तो ड्रायवर घाबरून स्वतः खाली आला आणि म्हणाला माझी काही चुक नाही मी शेठला घेऊन आलो होतो माझी भाड्याची गाडी आहे. प्ण मी एक काम करू शकतो जख्मी आण्णाला कराडाला पोहचवायच काम करेन आणि जख्मी आण्णाला कराडच्या दवाखान्यात आणल गेल. त्यांच्या हीसकावुन घेतलेल्या बंदुका विष्णुने पोलिस स्ठेशनला जमा केल्या. केस सिरीयस म्हणून सातारला पाठवण्यात आले. सातारच्या दवाखान्यात असताना माननीय यशवंतराव चव्हाण आण्णा बाळाला भेटले. तेव्हा आण्णा बाळा एढेच म्हणाले साहेब डॉक्टराना समजावुन सांगा कारण कराडच्या डॉक्टरानी सांगीतलय माझ्या हाताची बोटे लागणार नाहीत. यशवंतराव चव्हाणानी आण्णा बाळाच्या पाठीवरून हात फीरवला आणि सांगितल तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टराना सांगितले हा माझा माणुस आहे. आणि मग अण्णा बाळाची व्ही. आय. पी. पाहुण्या प्रमाणे सोय झाली. यातुन बरा होऊन आल्या नंतर अण्णाने सोसायटीच्या राजकारणारा भाग घेऊ नये अस सांगण्यात आल. पण हाडाचा जो कार्यकर्ता असतो दीनदुबळ्यांची सेवा करायची ज्याची जिद्ध आहे. जो गावाच्या सेवेसाठीच जन्माला आलेला आहे. त्याच रक्त थांबत नाही तो गप्प बसत नाही.

त्याने विचार केला ह्या काळ्या मातीला हीरवा शालु नेसवण्याकरता आपण़ भयरवनाथ पाणी पुरवठा योजना गावात आणायची. माननीय यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्या सहकाऱ्याने मुंबईला जाऊन मुंबईच्या वाऱ्या करून भयरवनाथ पाणी पुरवठा योजना मंजुर करून घेतली. पाईप येऊन पडल्या चाऱ्या खोदण्यात आल्या. आता पाणी या परीसरात फिरणार आमची शेती ऊसाची बनणार आम्ही श्रीमंत बनणार. लोक अंतःकरणाने आण्णा बाळाचे नाव घेवु लागले. आणि विरोधकांची माथी फिरु लागली. जर का हे पाणी शेतात फीरल गेल तर आण्णा बाळा, आण्णा बाळा हे नाव सगळीकडे होईल. नाही अण्णा बाळा हा राजकारणातून संपला पाहीजे. आणि आण्णा बाळांना संपविण्यासाठि आण्णा बाळांनाचा चुलत भाऊ जगु धोंडी पाटील हा थोडा माथेफिरु होता कडवट होता त्याला फितुर करण्यात आले.आण्णा बाळांच्या विरोधात त्याला उभा केला.

भयरवनाथ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी आण्णा बाळां मुंबईला गेले होते परत यायला वेळ लागलेला होता. आल्या वरती विचारल विष्णू कुठे गेला. तो शिकारीला गेलेला आहे अस सांगण्यात आल. विष्णुला वाघाच्या डुकराच्या शिकारीचा नाद होता. तो कोयना खो-यात गेला होता. सकाळाच्या प्रहरी