Jump to content

अणाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?अणाव

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,१९३.६७ चौ. किमी
जवळचे शहर कुडाळ
जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,१८६ (२०११)
• २/किमी
भाषा मराठी
बोलीभाषा मालवणी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 416812
• एमएच/०७

अणाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे.अणाव हे एक निसर्गरम्य व शैक्षणिकदृष्ट्या प्रगत गाव आहे . इथला निसर्गरम्य परिसर जणू पर्यटकांना साथ घालीत असतो. शांततेचे व ग्रामीण जीवनाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अणाव हे गाव आहे.

भौगोलिक स्थान:

[संपादन]

अणाव गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यभागी वसलेले आहे. गावाच्या सीमेला लागून हुमरमळा , तळगाव बाव - बांबोळी, ओरोस ही गावे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण अणाव येथून अवघ्या 3 किमी अंतरावर आहे.हे गाव मुंबई–गोवा महामार्गापासून सुमारे 2.5 किमी अंतरावर व कुडाळ शहरापासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन 5किमी अंतरावर आहे.गावाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 26 मीटर आहे.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

गावातील मुख्य व्यवसाय शेती हा आहे येथे बारमाही शेती केली जाते. शेतीसोबतच शेळीपालन,कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय असे व्यवसाय ही छोट्या मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत. पावसाळ्यात भात शेती हे येथील मुख्य पीक आहे.मात्र उन्हाळ्यात नाचणी, कुडीथ उडीद, चवळी मका, मिरची,मूग,मटकी,भुईमूग सूर्यफूल,वेगवेगळ्या पालेभाज्या,फळभाज्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात.

गावातील बरेच लोक शिक्षकी पेशात कार्यरत असल्याने शिक्षकांचा गाव असे या गावाला म्हटले जाते. हा गाव तंटामुक्त गाव आहे.तसेच महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार 2020-21 प्राप्त आहे.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

1 भाबगिरी गुहा

गावात भाबगिरी नावाचा डोंगर असून त्यात पांडवकालीन गुहा आहे.पांडव वनवासात असताना ती पांडवकालीन गुहा निर्माण केली असे म्हटले जाते. गावाच्या मध्यभागी असलेल्या डोंगराच्या सर्वात उंच ठिकाणी एका मोठ्या खडकामध्ये गुहेचे कोरीवकाम केलेले दिसते. इथे जाण्यासाठी गच्च झाडाजुडपातून वाट शोधत जावे लागते.

2 त्रिवेणी संगम

गावाच्या शेवटच्या तीरावर त्रिवेणी संगम हे ठिकाण नियम नयनरम्य आहे तीन नद्या व तीन गावे एकत्रित जोडली जातात असे हे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे संगम होय.कोसंबी देवी मंदिरापासून काही अंतरावर हे ठिकाण आहे.हातेरी नदी, पीठढवळ नदी व भंगसाळ नदी या तीन नद्या एकमेकास जिथे मिळतात तोच त्रिवेणी संगम होय.हीच नदी पुढे कर्लीची खाडी रूपाने मालवण देवबाग येथे अरबी समुद्राला जाऊन एकजीव होते.

दाभाचीवाडी तलाव

दाभाची वाडी येथे एक सुंदर तलाव आहे. याद्वारे जिल्हा मुख्यालयाला पाणीपुरवठा केला जातो. येथे मुलांसाठी उद्यान व खेळण्यासाठी जागा आहे. येथील सुर्यास्त पाहण्यासाठी संध्याकाळी पर्यटकांची गर्दी असते

सामाजिक वैशिष्ट्ये

[संपादन]

जीवन आनंद संस्था

या संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप परब हे आहेत. या संस्थेमध्ये गरीब, गरजू व निराधार व्यक्तींचे पुनर्वसन केले जाते. पण दूर येथील सविता आश्रमाची ही एक शाखा आहे. ईश्वराचे कार्य समजून अविरतपणे समाजसेवा या संस्थेमार्फत केली जात आहे.अणाव मयेकर वाडी येथे ही संस्था कार्यरत आहे.

आनंदाश्रय

या संस्थेचे अध्यक्ष श्री.बबन काका परब हे आहेत ही संस्था समाजातील निराधार वयोवृद्ध लोकांसाठी संजीवनी आहे. दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून अन्न वस्त्र, निवारा या अशी लोकांची सेवा केली जाते.अणाव थळकरवाडी येथे ही संस्था कार्यरत आहे.

गावातील लोक नेहमीच एकमेकांना मदत करतात. सामाजिक बांधिलकी येथे जपली जातेय.

शिक्षण आणि संस्कार

[संपादन]

गावातील शाळा:

गावात 3 प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहेत. 1) अणाव नं 1

2)अणाव दाभाचीवाडी

3) अणाव परबवाडा

या शाळांमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. कृतिशील शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले जाते.

मुलांना आनंददायी वातावरणात शिक्षण देणारी शाळा, सक्षम नागरिक बनवण्यासाठी सतत झटणारी शाळा ही विद्यार्थ्यांच्या अतिशय जवळची आणि मायेची सतत वर्षाव करणारी माऊलीच वाटते.

येथील निसर्गाचे सुंदर लेणे लाभलेल्या शाळा निसर्गाच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिक्षण देतात. उत्तम संस्कार आणि भयमुक्त वातावरण,स्वच्छता आणि शिस्त यातून नैतिक मूल्ये रुजवली जात आहेत.

गावात अणाव घाटचे पेड येथे नर्सिंग कॉलेज व फिसिओथेरोपी कॉलेज आहे.गावाच्या सीमेला लागून पणदूर येथे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे.त्यामुळे गावातील मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळत आहे.

वाचनालय

गावात एक मोठे वाचनालय आहे.त्याचे नाव रामेश्वर वाचनालय अणाव हे आहे. या वाचनालयाची स्थापना 1990 मध्ये झाली असून वाचनालयाचची एक मजली स्वतःची इमारत आहे. ग्रंथालयात 28, 500 ग्रंथ, नियमित 16 दैनिक 18 साप्ताहिके आणि 45 मासिके आहेत. वाचनालयात विविध स्पर्धांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

वाचन संस्कृती जपण्याचे बहुमूल्य काम वाचनालय करत आहे. वाचनालयामुळे मुलांना तसेच सर्व लोकांना वाचनाची आवड निर्माण झाली आहे. साधारणतः 5000 एवढे बाल साहित्य येथे उपलब्ध आहे.

संदर्भ

[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/