Jump to content

अग्निमित्र शुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अग्निमित्र या पानावरून पुनर्निर्देशित)


अग्निमित्र शुंग
सम्राट
अधिकारकाळ इ.स.पू. १४९ - इ.स.पू. १४१
राज्याभिषेक इ.स.पू. १४९
राज्यव्याप्ती उत्तरेकडील हिमालयापासून दक्षिणेकडील बेरारपर्यंत आणि पश्चिमेकडील पंजाबपासून पूर्वेकडील मगधपर्यंत
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव अग्निमित्र शुंग
पदव्या सम्राट
मृत्यू इ.स.पू. १४१
पाटलीपुत्र, बिहार
पूर्वाधिकारी पुष्यमित्र शुंग
उत्तराधिकारी वसुज्येष्ठ
वडील पुष्यमित्र शुंग
आई महाराणी देवमाला
पत्नी धारिणी
मालविका
इरावती
संतती वसुज्येष्ठ
वसुमित्र
राजघराणे शुंग वंश
धर्म हिंदू धर्म

अग्निमित्र शुंग हा शुंग घराण्यातील असून पुष्यमित्र शुंग आणि देवमाला याचा मुलगा होता. जेव्हा विदर्भ देशाचा मांडलिक राजा यज्ञसेन याने त्याचा शुंगसमर्थक असलेला चुलतभाऊ माधवसेन याला कैदी केले त्यावेळी पुष्यमित्राने त्याला विदर्भाच्या मोहिमेवर धाडले. अग्निमित्राने यज्ञसेनाचा युद्धात पराभव केला आणि माधवसेनाला मुक्त केले. त्याचसोबत त्याने विदर्भाच्या राज्याचे दोन भाग केले आणि ते या दोन भावांमध्ये विभागून विदर्भात राजकीय स्थैर्य प्रस्थापित केले.

त्याच्या या मोहिमेचे वर्णन आपणास संस्कृत महाकवी कालिदास याच्या 'मालविका-अग्निमित्र' या नाटकात आढळते.