अगेन्स्ट ऑल ऑड्स
अगेन्स्ट ऑल ऑडस: एसेस ऑन विमेन, रिलिजन अँड डेव्हलपमेंट फ्रॉम इंडिया अँड पाकिस्तान[१] हे भारतीय स्त्रीवादी कमला भसीन[२] आणि रितू मेनन[३] आणि पाकिस्तानी लेखिका निघत सईद खान[४] यांनी संपादित केलेले शोधनिबंधांचे संकलन आहे.
महत्त्वाचे मुद्दे
[संपादन]या शोधनिबंधांमुळे, संस्कृती, सामाजिक सहसंबंध, शिष्टाचार या बाबी निश्चित करण्यामध्ये ‘धर्म’ नावाची गोष्ट कशी महत्त्वाची भूमिका बजावत असते याचा वेध घेतलेला आहे. त्याचप्रमाणे भारतातील व पाकिस्तान मधील स्त्रियांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन व त्यांच्या जगण्यातील भौतिक वास्तव यावर शोधनिबंधांतून प्रकाश टाकलेला आहे. शोधनिबंधांतून अस्मिता, अयोग्य/चुकीची अवधानता आणि स्त्रियांकडून धर्माचा केला जाणारा रणनितिमय वापर यासारखे काही कठीण प्रश्न विचारलेले आहेत. या दोन्ही प्रदेशांतील विकासाची चौकट व उदयास येणारे धार्मिक हक्क या महत्त्वाच्या विषयांची मांडणी शोधनिबंधांतून करण्यात आलेली आहे.
संदर्भ सूची
[संपादन]- ^ Bhasin, Kamla; Menon, Ritu; Khan, Nighat Said (1994). Against All Odds: Essays on Women, Religion, and Development from India and Pakistan (इंग्रजी भाषेत). Kali. ISBN 9788185107745.
- ^ Switala, Kristin. "Kamla Bhasin". www.cddc.vt.edu. 2013-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-23 रोजी पाहिले.
- ^ ":::Welcome to the offical website of Women Unlimited:::". www.womenunlimited.net. 2018-03-23 रोजी पाहिले.
- ^ "Nighat Said Khan | Women's Learning Partnership". www.learningpartnership.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-23 रोजी पाहिले.