Jump to content

अक्करपट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?अक्करपट्टी

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १.१८७ चौ. किमी
जवळचे शहर बोईसर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
४७८ (२०११)
• ४०३/किमी
भाषा मराठी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०२
• +०२५२५
• एमएच४८
संकेतस्थळ: [http://Asara Mandir

Akkarpatti, Maharashtra 401502

https://goo.gl/maps/G9PXtF1p2Cx Asara Mandir Akkarpatti, Maharashtra 401502

https://goo.gl/maps/G9PXtF1p2Cx]

अक्करपट्टी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला १२ किमी अंतरावर हे गाव स्थित आहे.बोईसर रेल्वे स्थानकातून पश्चिमेला पास्थळ,परनाळी, कुरगाव मार्गाने ह्या गावाला जाता येते.

हवामान

[संपादन]

येथील हवामान उत्तर कोकणातील गावाप्रमाणेच उन्हाळ्यात उष्ण दमट,हिवाळ्यात थंड आणि कोरडे आणि पावसाळ्यात समशीतोष्ण असते. पावसाळ्यात येथे मुबलक प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन

[संपादन]

ह्या गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४७८ आहे त्यामध्ये २३० पुरुष तर २४८ महिला आहेत. एकूण १२३ कुटुंबे येथे राहतात.९ टक्के लोकसंख्या ही ० ते ६ वर्षापर्यंत असलेल्या लहान मुलांची आहे. सरासरी स्त्री पुरुष परिमाण १०७८ आहे. गावाची साक्षरता ९३ टक्के आहे. पुरुष साक्षरता ९५ टक्के तर स्त्री साक्षरता ९० टक्के आहे.

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. बोईसर रेल्वे स्थानकातून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नियमित बससेवा उपलब्ध आहेत. रेल्वे स्थानक ते अक्करपट्टी अशी ऑटोरिक्शासुद्धा उपलब्ध असते.

जवळपासची गावे

[संपादन]

आंबटपाडा,मुंडावळी, साळगाव,परनाळी,नवी देलवाडी, उनभट,पोफरण, पथराळी, वेंगणी,कुरगाव, दांडी(बोईसर) ही गावे अक्करपट्टी गावाच्या आसपास आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

तारापूर अणुऊर्जा केंद्र

संदर्भ

[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc