अंतर्गत ज्वलन इंजिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उजवे|इवलेसे|700 px|आंतर्गत ज्वलन इंजिनाचे तत्व अंतर्गत ज्वलन इंजिन (इंग्लिश: Internal combustion engine, संक्षेप: आयसी इंजिन) हे एक अशा प्रकारचे इंजिन आहे ज्यामध्ये हवेसोबत प्रक्रियेमुळे इंधनाचे ज्वलन होते. ह्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेला अतिदाबाचा व अतिउष्ण वायू प्रसरण पावतो व रासायनिक उर्जेचे रूपांतर यांत्रिकी उर्जेमध्ये होते.

आधुनिक मोटारवाहने आयसी इंजिनवरच चालतात. टू स्ट्रोक इंजिनफोर स्ट्रोक इंजिन हे आयसी इंजिनाचे सर्वात लोकप्रिय प्रकार आहेत. पेट्रोल इंजिन पेट्रोल ह्या इंधनावर चालते व त्यामध्ये पेट्रोलच्या ज्वलनाची सुरुवात एक ठिणगी पाडून केली जाते (Spark ignition) तर डीझेल इंजिन डिझेल इंधनावर चालते व त्यात डीझेलच्या ज्वलनासाठी डीझेल-हवा मिश्रणाचा दाब वाढवला जातो (Compression ignition). वॅंकेल इंजिन हे कमी लोकप्रिय चक्रीय इंजिनदेखील काही मोटारींमध्ये वापरले जाते.

विमानांमध्ये वापरले जाणारे गॅस टर्बाइन हे देखील एक प्रकारचे आयसी इंजिनच आहे.