अंजली पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंजली पाटील
अंजली पाटील
जन्म २६ सप्टेंबर, १९८७ (1987-09-26) (वय: ३५)
नाशिक, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०११ - ते आजपर्यंत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट दिल्ली इन ए डे
पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदिनी पुरस्कार
धर्म हिंदू

अंजली पाटील ( २६ सप्टेंबर १९८७) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री असून तिने मराठी, हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड, सिंहली आणि इंग्रजी चित्रपटात देखील काम केले आहे. तिने २०११ मध्ये दिल्ली इन ए डे हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली, ज्यात तिने रोहिणी नावाच्या मुलीची भूमिका साकारली. दिल्ली इन ए डे, चक्रव्यूह, न्यूटन तसेच सिंहली भाषेतील विथ यु विदाऊट यु या चित्रपटातील तिच्या भूमिका प्रसंशनिय ठरल्या. तर तेलुगू चित्रपट ना बंगारु तल्ली साठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दक्षिणेतील उत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा नंदिनी पुरस्कार देखील मिळाला.[१][२][३]

अंजली पाटील यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला. तिचे बालपण आणि शिक्षण महाराष्ट्रातील नाशिक येथे झाले. तिने आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षी चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेतला आणि तसे आपल्या पालकांना सांगितले. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभिनयाच्या शिक्षणासाठी पाठवले.[४][५]

अंजली पाटील (डावीकडे) IFFI Best Female Actor award पुरस्कार घेताना, २०१२
अंजली पाटील आणि पंकज त्रिपाठी चित्रपट न्यूटन च्या वर्ल्ड प्रीमियर ला झू प्लास्ट, बर्लिन येथे 2017.

चित्रपट[संपादन]

चलचित्र[संपादन]

वर्ष चित्रपट भाषा भूमिका नोंद
२०११ देल्ही इन अ डे हिंदी रोहिणी
ग्रीन बँगल्स हिंदी मनू लघुपट
२०१२ प्रथ्यायम तेलुगू दुर्गा
ओबा नथुवा ओबा इक्का सिंहली सेलवी
चक्रव्यूह हिंदी जुही
२०१३ एंटे मल्याळम दुर्गा
ना बंगारु तल्ली तेलुगू
अपना देश कन्नड वसुंधरा [६]
श्री हिंदी सोनू
२०१४ किल द रेपिस्ट? हिंदी मीरा शुक्ला
फाईंडिंग फॅनि इंग्रजी / कोंकणी स्टीफनी 'फॅनि' फर्नांडिस,
फॅनिची मुलगी
अतिथी कलाकार
२०१५ द सायलेंस मराठी मामी
मिसेस. स्कुटर हिंदी अशिमा
२०१६ मिर्झ्या हिंदी झीनत
२०१७ समीर हिंदी आलिया इरादे
न्यूटन हिंदी मालको
२०१८ मेरी निम्मो हिंदी निम्मो
काला तामिळ पुयल चारुमती गायकवाड तामिळ भाषेतील पदार्पण
२०१९ दिठी मराठी तुळसा
मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर हिंदी सरगम
२०२० मन फकिरा मराठी माही
२०२१ कुथीरैवाल तामिळ
बारडो मराठी आशालता

वेब सिरीज[संपादन]

वर्ष नाव भूमिका भाषा प्रक्षेपण नोंद
२०१९ हुतात्मा विद्युत मराठी झी फाईव्ह
२०२० अफसोस श्लोक हिंदी अमेझॉन प्राईम व्हिडीओ
२०२० माय क्लाइन्टस् वाईफ सिंदूरा हिंदी अमेझॉन प्राईम व्हिडीओ

संदर्भ[संपादन]

  1. ^ Gurvinder Singh bags Golden Peacock at IFFI 2012, Centenary Award to Mira Nair | DearCinema.com Archived 22 January 2013 at the Wayback Machine.
  2. ^ "IndiaGlitz -". 13 October 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Nandi Awards 2012 and 2013: Rajamouli, Ilayaraja, Samantha and Prabhas emerge winners". 1 March 2017.
  4. ^ Hungama, Bollywood (30 October 2012). "Introducing Anjali Patil: Prakash Jha's Naxal firebrand - Bollywood Hungama". 13 October 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "NDTVMovies.com : Bollywood News, Reviews, Celebrity News, Hollywood News, Entertainment News, Videos & Photos". Archived from the original on 30 January 2013. 13 October 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Bollywood actress Actress Anjali Patil in Kannada- Timesofap Archived 16 December 2012 at the Wayback Machine.

बाह्य दुवे[संपादन]