अंटार्क्टिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अँटार्क्टिका या पानावरून पुनर्निर्देशित)
अंटार्क्टिकाचे पृथ्वीवरील स्थान
Tangra Mountains

अंटार्क्टिका (रोमन लिपी: Antarctica ;) हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागर म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.

शोध[संपादन]

अंटार्क्टिका खंडाचा शोध जेम्स कुक याने १७७२ मधे लावला. त्याच सुमारास ७ जानेवारी १८२० या दिनी प्रथमच बेलिग्ज हाऊजेन या दर्यावर्द्याने ५० किलोमीटर अंतरावरून बर्फाच्या डोंगरांची रांग पाहिली आणि त्याची विस्तृत माहिती जहाजाच्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवली. म्हणून त्या दिवशी या खंडाचा शोध लागला असे मानले जाते. दक्षिण ध्रुवाभोवतीचे खंड क्षेत्रफळ १,३३,७७,००० चौ. किमी. हे खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड यांपासून त्यापेक्षा पुष्कळच दूर व अलग आहे. अंटार्क्टिकासभोवतीच्या महासागराला ‘अंटार्क्टिक महासागर’ किंवा ‘दक्षिण महासागर’ म्हणतात. परंतु तो खरोखर हिंदी, अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांचा दक्षिण भाग होय. या महासागरांवरून सतत वाहणाऱ्या थंड व जोरदार वाऱ्यांना जमिनीचा अडथळा कोठेच होत नसल्यामुळे हा महासागर नेहमीच अस्थिर व खवळलेला असतो. त्याच्या जोडीला अंटार्क्टिकावरून आलेले हिमनग, हिमखंड, बर्फाची चकंदळे यांमुळे हा नौकानयनास अगदी धोकादायक आहे. यामुळे अगदी अलीकडील काळापर्यंत हे खंड अज्ञातच होते. याची बाह्यरेषा पूर्व गोलार्धात जवळजवळ दक्षिण ध्रुववृत्ताला धरून आहे. पश्चिम गोलार्धात मात्र अंटार्क्टिक द्वीपकल्पाचा निमुळता भाग जवळजवळ ६३० द. पर्यंत उत्तरेकडे गेलेला आहे. या द्वीपकल्पाच्या एका बाजूला वेडेल व दुसऱ्या बाजूला रॉस, अमुंडसेन आदी समुद्र व उपसागर यांचे किनारे ७०० द. ते ८०० द. च्या दरम्यानपर्यंत आत गेलेले आहेत. या द्वीपकल्पाजवळ काही बेटे आहेत. द्वीपकल्पाच्या टोकाजवळ दक्षिण शेटलंड बेटे आहेत. अंटार्क्टिका खंडावर उत्थानजन्य पर्वतश्रेणी असून मार्कहॅम, सायपल, लिस्टर, कर्कपॅट्रिक वगैरे शिखरे ४,५०० मीटरहून अधिक उंच आहेत. रॉस बेटावर मौंट एरेबस हा सु. ३,७३६ मी. उंचीचा जागृत ज्वालामुखी आहे. खंडाच्या मध्यभागी बर्फाच्छादित उंच पठार आहे. दक्षिण ध्रुवाची उंची सु. २,८०० मी. आहे. खंडाची सरासरी उंची १,८०० मी. असून ती इतर कोणत्याही खंडाच्या सरासरी उंचीपेक्षा पुष्कळ अधिक आहे. पॅसिफिक बाजूच्या व्हिक्टोरिया लॅंडपासून अटलांटिक बाजूच्या कोट्स लॅंडपर्यंत गेलेल्या ट्रान्सअंटार्क्टिक या ४५० मी. उंचीच्या उत्थानजन्य पर्वतश्रेणीने या खंडाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन असमान भाग पाडले आहेत. पूर्व भाग पश्चिम भागाच्या सु. दुप्पट मोठा आहे. पश्चिम अंटार्क्टिकाचा बराच भाग बर्फाखालील द्वीपसमूहांचा बनलेला आहे. बेटांच्या दरम्यान बर्फाची जाडी ४,२७० मी. आहे. खंडावरील बर्फाचा थर सरासरीने सु. १.६ किमी. जाडीचा आहे. जगातील शुद्ध पाण्याच्या एकूण साठ्याचा फार मोठा भाग या खंडावर हिम व बर्फरूपाने साठलेला आहे. पूर्व अंटार्क्टिका हा एक सलग खंडप्रदेश असावा. तो अतिशय उंचसखल आहे. काही ठिकाणी बर्फ घसरून जाऊन पर्वताचे भाग उघडे पडले आहेत. दक्षिण ध्रुव या पूर्व भागातच आहे. व्हिक्टोरिया लॅंडजवळचा भाग एक विस्तीर्ण सखल बर्फाच्छादित मैदान असून काही ठिकाणी भूमी बर्फाच्या वजनाने समुद्रसपाटीखाली खचलेली आहे, दक्षिण ध्रुवापासून ३०० ते ५०० किमी. पर्यंतच्या भागात आढळणाऱ्या हलक्या बिट्यूमिनस कोळशाच्या दृश्यांशातील जीवाश्मांवरून हा प्रदेश पुर्वी केव्हा तरी अरण्यमय होता असे दिसते. नंतर तेथे आजच्यासारखा प्रदेश आला तो हवामानातील दीर्घकालीन बदलामुळे की ध्रुवाच्या स्थलांतरामुळे की खंडपरिवहनामुळे, हा संशोधनाचा विषय आहे. या खंडावर अल्प प्रमाणात लोखंड, मॅंगेनीज, तांबे, शिसे, मॉलिब्डिनम व युरेनियम आढळले आहे. अधिक संशोधन चालू आहे.

दक्षिण ध्रुवाभोवतीचे खंड क्षेत्रफळ १,३३,७७,००० चौ. किमी. हे खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड यांपासून त्यापेक्षा पुष्कळच दूर व अलग आहे. अंटार्क्टिकासभोवतीच्या महासागराला ‘अंटार्क्टिक महासागर’ किंवा ‘दक्षिण महासागर’ म्हणतात. परंतु तो खरोखर हिंदी, अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांचा दक्षिण भाग होय. या महासागरांवरून सतत वाहणाऱ्या थंड व जोरदार वाऱ्यांना जमिनीचा अडथळा कोठेच होत नसल्यामुळे हा महासागर नेहमीच अस्थिर व खवळलेला असतो.

भूगोल[संपादन]

अंटार्क्टिका खंड गोलाकार असून त्याचा एक उपखंड आहे. उपखंडाचे तापमान अंटार्क्टिका खंडाप्रमाणे अतिशय थंड नाही. याच उपखंडापासून अंटार्क्टिका अन्य भूखंडांपेक्षा जवळ पडतो. अंटार्क्टिकापासून दक्षिण अमेरिकेचे अंतर एक हजार किलोमीटर आहे, ऑस्ट्रेलिया अडीच हजार किलोमीटर, आफ्रिका चार हजार किलोमीटर आणि भारत बारा हजार किलोमीटर अंतरावर आहे. अंटार्क्टिक्याचा तट हा समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १०० मीटर उंच आहे. दक्षिण ध्रुवाजवळचे पठार अंदाजे ३००० मीटर उंचीवर आहे.

हा सर्व खंडापेक्षा सर्वात जास्त थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वसाधारण सर्वात जास्त उंचावर असणारा खंड आहे. १४.४२५ दशलक्ष वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा युरोप व ओशेनिया नंतरचा तिसरा सर्वात लहान खंड आहे. याचा ९८% पृष्ठभाग हा र्बफाच्छादित आहे. रशियन एफ. जी. वानबेलिंग्श्वासेन इंग्रज एडर्वड ब्रान्सफिल्ड व अमेरिकन नाथानियल पामर यांची १८२० मध्ये सर्व प्रथम अंटार्क्टिका बघितल्याचा दावा. इ. स. १७६०ते १९०० पर्यंतचा काळ अंटंार्क्िटका व त्याजवळच्या भागाचा समुद्राच्या संशोधन मोहिमांनी गाजला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अंटार्क्टिकाच्या मोहिमेच्या सुवर्णकाळात रॉर्बट स्कार्ट स्कॉट व नंतर अर्नेस्ट शाकलेटन यांनी आतापर्यंत मोहिमा केल्या. रॉल्ड अ‍ॅमुडसन डिसेंबर १९११ मध्ये दक्षिण धृवावर पोहोचला. १९१२ मध्ये स्कॉटसुद्धा पोहोचला. सात राष्ट्रांनी खंडावरील भागांवर दावा केला. इतर राष्ट्रांनीसुद्धा मोहिमा केल्या. १९५७-५८ मध्ये १२ राष्ट्रांनी संयुक्त अभ्यांसाकरिता ५० स्थानके निर्माण केलीत. १९६१ मध्ये झालेल्या करारानुसार अंटार्क्टिकाला अराजनैतिक वैज्ञानिक अभ्यासाकरिता राखून ठेवण्यात आले. १९९१ मधील करारानुसार खनिज उत्खननावर नेहमीकरिता बंदी. पृथ्वीच्या दक्षिण धृवाभोवती एक अफाट पसरलेली भूमी आहे. हेच अंटार्क्टिका खंड होय. अगदी काल-परवापर्यंत जगाला या सातव्या खंडाची माहिती नव्हती. सन १७७४ साली कॅप्टन कुक याने या खंडाबद्दल जगाला सांगितले. पुढे १४ डिसेंबर १९११ रोजी रॉल्ड अमुंडसेन हा नॉर्वे देशाचा नागरिक प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचला आणि येथून पुढे या नव्या खंडाबाबत संशोधन सुरूच झाले. भारताने सुद्धा आपले कायमस्वरूपी संशोधन केंद्र तेथे उभारले असून त्या केंद्राला आपण 'दक्षिण गंगोत्री' हे नाव दिले आहे. जगातील प्रगत देशांनी येथेही आपली सज्ञ्ल्त्;ा स्थापण्याचा मनसुबा रचला. पण मग साम्राज्य विस्तारासाठी युद्धे करावी लागतील. तिसरे महायुद्ध कुणालाच नको आहे. त्यामुळे ३२ राष्ट्रांनी एकत्र येऊन एक तह केला. तोच 'अंटार्क्टिक ट्रीटी' होय. यात आपणही सहभाही आहोत. या तहानूसार, अंटार्क्टिका खंडावर कोणताही देश मालकीहक्क सांगू शकत नाही. तर तेथे केवळ शांततापूर्ण संशोधन करू शकतो. मात्र संशोधन करीत असता येथील पर्यावरणाचा नाश होणार नाही. वातावरण दूषित होणार नाही याची काळजी सभासद देशांनी घ्यायची आहे वगैरे वगैरे.

पूर्व अंटार्क्टिकात रूपांतरित व अग्निजन्य खडकांच्या कॅम्ब्रियनपूर्व आधारावर पुराजीव-महाकल्पातील व मध्यजीव-महाकल्पातील गाळाचे थर आहेत. रॉस समुद्रामागे गटपर्वतांची रांग आहे. विभंगामुळे तळाचे रूपांतरित व अग्निजन्य खडक वर आले असावे. पश्चिम अंटार्क्टिकात गाळाचे खडक व वलीपर्वत आढळतात. त्यातच अँडियन जातीचे अग्निजन्य खडक आहेत. तृतीय युगातील व अर्वाचीन काळातील ज्वालामुखीही आहेत.

अंटार्क्टिकावर जीवसृष्टी बहुतेक नाहीच, असे म्हणता येईल. काही शेवाळ्याच्या जातीच्या वनस्पती व एकदोनं प्रकारची फुलझाडे आणि गवताचे प्रकार आहेत. किनाऱ्यावरील बर्फ व ते वितळून झालेल्या डबक्यांत काही अतिसूक्ष्म जीव आढळतात. तसेच काही कीटक, कोळी व सूक्ष्म जीव आहेत. जमिनीवरील सर्वांत मोठा प्राणी म्हणजे सु. २·५ मिमी. लांबीचा घरातल्या माशीच्या जातीचा, बिनपंखाचा प्राणी होय. भोवतीच्या समुद्रात मात्र विपुल जलचर आहेत. देवमासे व सीलमासे येथे येतात. देवमाशांच्या शिकारीचे हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मात्र आश्चर्य वाटण्याइतकी मोठी आहे. बादशहा (एम्परर) पेंग्विन हाच काय तो येथे वर्षभर राहणारा पक्षी आहे. अ‍ॅडेलाय पेंग्विन, सी पेट्रेल व साउथ पोलर स्कुआ वगैरे पक्षी मधूनमधून येतात.

१९४३ पासून या खंडावर माणसे सतत येत जात आहेत. तथापि कायम मनुष्यवस्ती अशी नाही. जी काही माणसे येतात ती संशोधनासाठी येतात. तीव्र थंडी, जोरदार झोंबणारे वारे, बर्फाची वादळे, अशा प्रतिकूल हवामानामुळे या खंडाची माहिती १९ व्या शतकापर्यंत विशेषशी नव्हती. देवमाशांच्या शिकारीसाठी गेलेल्या काही लोकांनी या खंडाचा भाग पाहिला असावा. दक्षिणेकडे आणखी एक भूप्रदेश असावा, ही कल्पना मात्र बरेच दिवस रूढ होती. विल्यम स्मिथ या ब्रिटीश खलाशाने १८१९ च्या फेब्रुवारीत दक्षिण शेटलंड बेटांचा शोध लावला. अमेरिकन खलाशी कॅप्टन पामर याने एक अज्ञात किनारा पाहिल्याने रशियन खलाशी अ‍ॅडमिरल ⇨बेलिंग्सहाउझेन यास सांगितले. त्याने इतरांस सांगताना त्या भागास ‘पामर्स लॅंड’ असे म्हटले. कॅप्टन ब्रॅन्सफील्ड या ब्रिटीश खलाशाने १८२१ च्या जानेवारीत साउथ शेटलंड बेटे व अंटार्क्टिका यांच्यामधून प्रवास केला. १८३० मध्ये जॉन बिस्को या इंग्रजाने तेथे उंच पर्वत पाहिले. दोन वर्षानंतर तो एका बेटावर उतरला. त्याने त्या बेटास व शेजारच्या द्वीपकल्पास ‘ग्रॅहॅम्स लॅंड’ असे नाव दिले. अर्जेंटिनाने या द्वीपकल्पास सान मार्टिन द्वीपकल्प, चिलीने टेरा डी ओ’ हिगिन्स द्वीपकल्प, अशी नावे दिली. आता आंतरराष्ट्रीय संमतीने त्याला ‘अंटार्क्टिक द्वीपकल्प’ हे नाव दिले आहे. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात जेम्स वेडल, जॉन बॅलनी, द्यूमॉं द्यूर्व्हिल, चार्ल्स विल्क्स, व ⇨जेम्स सी. रॉस यांनी या भागात संशोधन केले. यानंतर सु. ५० वर्षे संशोधकांचे लक्ष आर्क्टिक महासागराकडे होते. १८९७-९९ मधील गर्लाशे या बेल्जियन खलाशाच्या सफरीमुळे पुनः अंटार्क्टिकाकडे लक्ष गेले. २० व्या शतकातील मोहिमा अधिक सुसंघटित व सुसज्ज होत्या. त्यात ⇨बॉर्कग्रेव्हिंक, विल्यम ब्रूस, एरिक फोन ड्रीगाल्स्की, ऑटो नर्दन्शल्ड,⇨रॉबर्ट स्कॉट, झां शार्को, आणि डग्लस मॉसन यांच्या सफरी उल्लेखनीय आहेत. या सफरी हिवाळयातच झाल्या आणि त्यांत शास्त्रीय पाहणी पुष्कळच झाली. यातील बऱ्याच मोहिमांचे ध्येय दक्षिण ध्रुव गाठणे हे होते. त्यात १९०८ मध्ये ⇨ शॅकल्टनला अपयश आले. परंतु १४ डिसेंबर १९११ ला दक्षिण ध्रुवावर प्रत्यक्ष जाऊन पोचण्यास ⇨रोआल आमुनसेनयशस्वी झाला. त्याचे पथक सुखरूप परत आले. १८ जानेवारी १९१२ ला रॉबर्ट स्कॉटही दक्षिण ध्रुवावर जाऊन पोचला. परंतु परत येताना तो व त्याचे लोक मृत्यू पावले. पहिल्या जागतिक महायुद्धाने या प्रयत्नांस खीळ बसली. युद्धानंतर जॉर्ज ह्यूबर्ट व ⇨रिचर्ड इ. बर्ड हे विमानाच्या साहाय्याने या प्रदेशावर उतरणारे पहिले वीर ठरले. जॉन रायमिलची १९३४-३७ ची ब्रिटिश मोहीम, १९३६-३७ ची लार्स ख्रिश्चनसनची नॉर्वेजिअन मोहीम, १९३८-३९ चा लिंकन एल्सवर्थचा प्रवास आणि देवमाशांचा प्रसार व त्यांच्या अन्न मिळविण्याच्या जागा यांचा शोध करण्यासाठी निघालेली ब्रिटिश नौका ‘डिस्कव्हरी-२’ यांनी अंटार्क्टिकाविषयी महत्त्वाची माहिती मिळविली. १९३९ ते ४१ मध्ये बर्डच्या नेतृत्वाखाली लिट्‌ल अमेरिकेतील बे ऑफ व्हेल्स व अंटार्क्टिक द्वीपकल्प येथील एकमेकांपासून ३,२०० किमी. दूर असलेल्या ठाण्यांवरून ‘यू. एस. अंटार्क्टिक सर्व्हिस’ ची शास्त्रीय पाहणी व संशोधन सुरू झाले. १९४४ मध्ये मूर याच्या नेतृत्वाखाली अंटार्क्टिक द्वीपकल्प व मुख्य खंड यांच्या किनाऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी व हवामानकेंद्रे स्थापन करण्यासाठी ब्रिटिश मोहीम निघाली. १९४६-४८ मध्ये आणखी तीन अमेरिकन मोहिम निघाल्या. परंतु बर्डच्या नेतृत्वाखाली निघालेली अमेरिकन आरमाराची ‘ऑपरेशन हायजंप’ ही १९४७ मधील मोहीम सर्वांत सुसज्ज, सुसंघटित, १३ बोटी व ४,००० माणसे अनेक यांत्रिक साधने व उपकरणे असलेली अशी सर्वांत मोठी मोहीम होती. युद्ध संपल्यामुळे बरेच लष्करी साहित्य, उपकरणे, विमाने वगैरे उपलब्ध होती आणि मोहिमेतील लोक पूर्ण पगारी होते. विमानांच्या व चलच्चित्रपटांच्या साहाय्याने अंटार्क्टिकाच्या उंचसखलपणाची विस्तृत माहिती जमविण्यात आली. नवीन उत्तुंग शिखरे आढळली; न गोठलेले प्रदेश व त्यात उबदार पाण्याच्या सरोवरांचा एक प्रदेश ऑस्ट्रेलियाच्या बाजूच्या भागात दिसून आला; रॉस बर्फथराखाली बेटे आहेत असे चुंबकत्वमापकाच्या साह्याने दिसून आले. १९४७-४८ च्या दुसऱ्या छोट्या मोहिमेने या माहितीत भर घातली. १९४६-४८ मधील फिन रोनीच्या ब्रिटिश मोहिमेने अंटार्क्टिक द्वीपकल्पापासून आग्नेयीस उंच मध्य पठाराकडे गेलेली एक पर्वतश्रेणी शोधून काढली. ही दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वतश्रेणीचीच पुढील साखळी असावी, असे ठरले. १९४७ मध्ये ऑस्ट्रेलियाने अंटार्क्टिकामध्ये अधिकृत मोहीम पाठविली. चिली, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, ब्रिटन, फ्रान्स, न्यू झीलंड हे देश अंटार्क्टिकाच्या निरनिराळ्या भागांवर स्वामित्व सांगू लागले. अशा स्वामित्वासाठी तेथे प्रत्यक्ष वसाहत करणे हे मात्र कोणालाच जमले नाही. अमेरिका, रशिया, जपान, स्वीडन, जर्मनी, पोलंड, दक्षिण आफ्रिका हे हक्क न सांगता संशोधनात भाग घेतात. अमेरिका स्वतः हक्क सांगत नाही आणि दुसऱ्याचा हक्क मानीतही नाही. मात्र संशोधकांनी अंटार्क्टिकाच्या निरनिराळ्या भागांत आपल्या देशाची निशाणे रोवली आहेत. आंतरराष्ट्रीय भूभौतिक वर्षाच्या (१ जुलै १९५७ ते ३१ डिसेंबर १९५८) काळात अंटार्क्टिकाचे अनेकविध संशोधनाचे कार्य हक्क सांगणाऱ्या व इतर राष्ट्रांनी सहकार्याने हाती घेतले. वातावरणाचा अभ्यास, भूचुंबकीय अभ्यास, ध्रुव प्रकाशाचा अभ्यास-असे अनेक प्रकल्प या काळात हाती घेतले गेले. अमेरिकेच्या संशोधकांनी खुद्द दक्षिण ध्रुवावरच आपले निरीक्षण-केंद्र स्थापन केले. हे खंड एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सबंध ओलांडून जाण्याची मोहीम ब्रिटीश संशोधक ⇨व्हिव्हियन फुश याने १९५८ मध्ये पुरी केली. तिला एव्हरेस्टविजेता न्यू झीलंडचा ⇨सर एडमंड हिलरी याने प्रत्यक्ष ध्रुवावरच मदत पोचविली. या काळात येथील सर्वांत उंच शिखर विन्सन मासिफ हे सु. ५,१३४ मी. उंचीचे आढळले. हे सहकार्याचे पर्व संपल्यावर १९५९ मध्ये त्यात भाग घेणाऱ्या १२ राष्ट्रांनी ३० वर्षांचा एक करार केला व त्या अवधीत जुन्या हक्कांना बाध येऊ नये, परंतु सहकार्याने संशोधन चालू ठेवावे, तेथे त्या आधारावर नवीन हक्क सांगू नये, अंटार्क्टिका फक्त शांततेसाठीच वापरावे, तेथे अणुस्फोट करू नये किंवा त्यामुळे दूषित झालेला कचरा टाकू नये, मात्र शांततेसाठी शास्त्रीय अणुसंशोधन करावे, असे ठरले. जगातील इतर राष्ट्रांनीही त्याला मान्यता दिली आहे आणि हाच करार पुढे नित्यासाठी चालू राहिला तर अंटर्क्टिका हा जगातला पहिला आंतरराष्ट्रीय प्रदेश ठरेल.

हवामान[संपादन]

अंटार्क्टिका दक्षिण गोलार्धात असल्याने भारतात जेव्हा उन्हाळा असतो; तेव्हा अंटार्क्टिक्यावर हिवाळा असतो. उन्हाळ्यात समुद्रकिनारी भागांमध्ये तापमान शून्याच्या खाली -५ डिग्री सेंटिग्रेड ते -१० डिग्री सेंटिग्रेड असते. हिवाळयात समुद्रकिनाऱ्यावरचे तापमान -४० ते -५० डिग्री सेंटिग्रेडपर्यंत खाली जाते. दक्षिण ध्रुवाच्या पठारावर -७० डिग्री सेंटिग्रेड ते -८० डिग्री सेंटिग्रेड इतकेही ते खाली जाते. अंटार्क्टिक्याच्या दक्षिण ध्रुवीय पठारावर कमीत कमी तापमानाची नोंद, इ.स. १९८३ साली, रशियन स्टेशन ‘वास्तोक’ येथे -८९.६८ डिग्री सेंटिग्रेड इतकी झाली आहे. अंटार्क्टिका हा जगातल्या कोणत्याही अन्य वाळवंटी भागांपेक्षा अत्यंत रूक्ष आहे.अंटार्क्टिका खंडावर जगातील सर्वांत कमी तापमान आढळले आहे. सर्वांत कमी थंडीच्या काळातही किनाऱ्यावरील तपमान ०० से. व अंतर्भागातील तपमान -२०० से. ते - ३५0 असते. हिवाळ्यात किनाऱ्यावर - २०० से. ते -३०० से. आणि अंतर्भागात -४०० से. ते - ७०० से. असते. पठारावरील सरासरी तपमान -५५० से. असते. तर सर्वांत कमी तपमान -८८·३० से. हे ३,४३० मी. उंचीच्या, रशियन ठाण्यावर २४ ऑगस्ट १९६० रोजी नोंदले गेले आहे. प्रत्यक्ष दक्षिण ध्रुवावरील अमेरिकन ठाण्यावर बिनसूर्याच्या सहा महिन्यांत कमीतकमी तपमान -७४·५० से. नोंदले गेले. अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यावर प्रतिवर्षी फक्त ३० ते ६० सेंमी. हिम पडते; अंतर्भागात ते फक्त १० ते १५ सेंमी. पडते. किनाऱ्यावर व लगतच्या समुद्रावर मिळून बर्फाचे प्रचंड थरांवर थर साठलेले असतात. त्यापासून सपाट माथ्याचे मोठेमोठे हिमनग सुटून समुद्रात येतात. त्यांपैकी काहींची लांबी सु. १५० किमी. पर्यंत आढळलेली आहे. हे पाण्याबाहेर सु. ६०-७० मी. उंच असतात. हिमनद्यांतून सुटलेले हिमनग सु. १५० मी. उंचीपर्यंत, वेगवेगळ्या आकारांचे असतात. जहाजाच्या डोलकाठीवरूनही पलीकडे दृष्टी पोचत नाही एवढ्या विस्ताराचे बर्फाचे थर समुद्रावर असतात. हिमनद्यांच्या जिव्हा समुद्रात आतपर्यंत आलेल्या असतात.

लोकसंख्या[संपादन]

अंटार्क्टिक्यावर कायमस्वरूपी राहणाऱ्या व्यक्तींची संख्या शून्य आहे. अनेक राष्ट्रांच्या प्रयोगशाळांत ८०० ते ९०० शास्त्रज्ञ निरनिराळ्या देशातून शास्त्रीय संशोधनासाठी येतात

आंतरराष्ट्रीय राजकारण[संपादन]

दक्षिण ध्रुवावर कोणत्याही एका देशाचा मालकी हक्क नाही किंवा कोणत्याही विशिष्ट देशासाठी तो विभागला गेलेला नाही, असे मानले जाते. तरीही समुद्रावरील मालकीनुसार या खंडाचे भाग पाडले गेले आहेत.

अर्थशास्त्र[संपादन]

जगातील ९० टक्के बर्फाचा आणि ७० टक्के पाण्याचा साठा दक्षिण ध्रुवावर आहे. शिवाय, या खंडाखाली पेट्रोलियमचे साठे आढळले आहेत.

संशोधन[संपादन]

भारतीय संशोधन[संपादन]

जानेवारी ९ इ.स. १९८२ साली भारताच्या पहिल्या मोहिमेतील सदस्यांनी अंटार्टिक्यावर प्रथमच भारताचा झेंडा फडकवला. इ.स. १९८३ मध्ये कर्नल सत्यस्वरूप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण गंगोत्री हे कायमस्वरूपी स्थानक बांधले. तेव्हापासून या स्थानकावर वर्षभर राहण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. येथे केलेले संशोधन सायंटिफिक कमिटी फॉर अंटार्क्टिक रिसर्च (इंग्लिश: Scientific Committee for Antarctic Research; लघुरूप: SCAR, एस.सी.ए.आर. ;) या संस्थेला पाठवले जाते व तेथून ते सर्व राष्ट्रांना जाते. भारत हा अंटार्क्टिका येथे पोहोचलेला जगातील १३ वा देश आहे. त्यामुळे भारताला अंटार्क्टिकासंबंधित सल्लामसलतीचा हक्क मिळाला आहे. दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र बंद करण्यात आलेले असून, इ.स. 1989 मध्ये मैत्री या कायमस्वरुपी स्थानक बांधण्यात आलेले आहे.

Antarctic philately
Antarctic base

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: