सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ६

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवीन Template[संपादन]

मी Template:पौराणिक व्यक्ती येथे नवीन Template बनवीले आहे ज्याचा उपयोग रामायण, महाभारत तसेच इतर पौराणिक व्यक्तिमत्त्वांच्या माहिती पानासाठी करता येवू शकतो. कॄपया ह्यावर आपले आणि इतरांचे विचार आणि सुधारणा कळवल्यास त्याचा वापर करता येऊ शकेल. Fleiger 12:20, 25 ऑक्टोबर 2006 (UTC)

'मुंबई' व 'मासिक सदर' बदल...[संपादन]

अभय,

मी मुंबई लेखातील शुद्धलेखन तपासून आवश्यक तेथे दुरुस्त्या केल्या आहेत. परंतु मला त्या दुरुस्त्या Wikipedia:सदर/ऑक्टोबर १५, २००६ या लेखात करता आल्या नाहीत. तिथे मला केवळ 'स्रोत पहा' असा टॅब दिसतोय.. म्हणजे ते पान बहुदा लॉक केलेले असावे.

तुम्ही हे बदल त्या पानावर स्थलांतरित करू शकाल काय?

BTW, मुखपृष्ठातील काही टेंप्लेट्समध्ये मी 'विकिपीडिया' असे केलेले बदल तुमच्या सूचनेनुसार 'विकिपिडीया' असे केले आहेत. तरीही Wikipedia च्या उच्चारानुसारी लेखनाबद्दल शंका आहेत. सामान्यतः दीर्घान्त (इथे शेवटचा 'या') शब्दांत उपांत्य अक्षर दीर्घ नसते. उदा.: Media शब्दाचे मराठीतील उच्चारानुसारी लेखन - 'मीडिया'. त्यामुळे 'डी' असा उपांत्य उच्चार दीर्घ असण्याबद्दल माझी शंका अजूनही फिटली नाहीये. असो.

--संकल्प द्रविड 06:35, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

विकिपीडिया[संपादन]

To my understanding some discussion was already taken place about this issue so I belived "विकिपीडिया" is correct. Please have a full discussion on this subject. विजय 14:40, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

Re:विकिपीडिया[संपादन]

संकल्प,

Wikipedia:सदर/ऑक्टोबर १५, २००६ हा लेख असुरक्षित केला आहे.

इंडिया, अरेबिया, रशिया, वाडिया, मारिया इ. शब्दांमध्ये ऱ्हस्व इ आहे. मिडीयासुद्धा माझ्यामते मिडिया असाच लिहीला पाहिजे. :-]

माहितगार, विकिपिडीया/विकिपीडिया बद्दल तुमचे काय मत आहे?

अभय नातू 15:03, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

Re:विकिपीडिया[संपादन]

>>मिडीयासुद्धा माझ्यामते मिडिया असाच लिहीला पाहिजे

अभय, मीही अंशतः तेच म्हणतोय. Media हा शब्द लिहिताना, त्यातील di चा उच्चार र्‍हस्व इकाराप्रमाणे लघु ऐकू येतो म्हणून 'डि' आणि Me चा उच्चार त्यापेक्षा दीर्घ ऐकू येतो म्हणून 'मी'.. थोडक्यात Media चे 'मीडिया' असे लेखन उच्चाराप्रमाणे आहे. तुम्ही देत असलेल्या 'इंडिया, अरेबिया, रशिया, वाडिया, मारिया' या उदाहरणांतदेखील उपांत्य इकार लघु ऐकू येत असल्यामुळे र्‍ह्स्व लिहिला जातो. त्याबद्दल मी सहमत आहे.

फक्त Media, Wikipedia, Encyclopedia या शब्दांत उप-उपांत्य अक्षरांचे उच्चार(म्हणजे अनुक्रमे Me, pe, pe syllables चे) दीर्घ ऐकू येतात. त्यामुळे त्यांचे लेखन मीडिया, विकिपीडिया, एन्सायक्लोपीडिया करणे मला योग्य वाटते (थोडक्यात मुद्दा '-pedia'तल्या pe आणि di च्या र्‍हस्व/ दीर्घ लेखनाबद्दल आहे.).

विजय म्हणतात तसे यावर इतर जाणकार संपादकांची मते घ्यायला हरकत नाही.

बाकी, Wikipedia:सदर/ऑक्टोबर १५, २००६ या संपादनीय केल्याबद्दल धन्यवाद.. त्यात लवकरच सुधारणा करतो.

--संकल्प द्रविड 17:49, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

एक उत्साहवर्धक बातमी[संपादन]

मी आज मराठी विकिपीडिया करिता सहकार्य मिळावे या करिता दोन प्रथित यश सिध्दहस्त मराठी भाषाप्रभू व्यक्तींना सहकार्य मागण्याचे यशस्वी धाडस केले.

"मराठी भाषेचा इतिहास" कार श्री. गं. ना. जोगळेकर हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आहेत.त्यांनी मराठी भाषा,साहित्य आणि साहित्यिक यांचे बद्दलचे विकिपीडियावरून मुद्रित केलेले लेख तपासून मान्यवरांकडून मार्गदर्शन देण्याचे मान्य केले आहे.तसेच "मराठी भाषेचा इतिहास" चे संदर्भ वापरण्या करिता तत्त्वतः मान्यता दिली आहे.फक्त हे संदर्भ नंतर तपासून घ्यावे लागतील.या संदर्भात अभय नातू आणि संकल्प द्रविड यांस खास विनंती आहे की त्यांनी निवडक लेख सुचवावेत ते मी प्रिंट करून तपासून त्यांच्या सूचनांची माहिती इथे उपलब्ध करून देईन.

दुसरे डॉ. लीला गोवीलकर यांनी त्यांचे "मराठी व्याकरण" या पुस्तकाचे संदर्भ देण्यास लेखी मान्यता देण्याचे मान्य केले आहे. त्यांचे पुस्तक आज निश्चित पणे मानदंड म्हणून वापरता येईल.

आपला

विजय 14:45, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

विजय,
खूप उशिराने उत्तर लिहित असल्याबद्दल तुमची क्षमा मागतो. तुमच्या संदेशात म्हटल्याप्रमाणे गं. ना. जोगळेकरांकडून व लीला गोविलकरांकडून सहकार्य मिळणार असल्याची बातमी चांगली आहेच. त्याचबरोबर अजून एक शक्यता पडताळून पाहण्याची सूचना कराविशी वाटते: गं. ना. जोगळेकर हे 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' या संस्थेचे पदाधिकारी आहेत.. आणि म. सा. प. कडे आजवरच्या साहित्यसंमेलनाध्यक्षांचे फोटो तसविरीच्या स्वरूपात लावले आहेत; तेव्हा त्यांच्याकडून ही चित्रे मराठी विकिपीडियाकरता मिळू शकतील का याबद्दल विचारणा करता येईल का? अर्थात याबाबत मराठी विकिपीडियावच्या कॉपीराइट अधिकारांबाबतच्या धोरणांमध्ये राहूनच प्रस्ताव ठेवावा लागेल. अभय/ इतर प्रबंधक यावर अधिक प्रकाश पाडू शकतील.
चित्रांखेरीज म. सा. प. कडून साहित्यिकांविषयी, मराठी साहित्य संमेलनांविषयी, साहित्यसंमेलनाध्यक्षांविषयी माहिती मिळू शकते. याबद्दलही काही मदत मिळवता येऊ शकेल का?
एकंदरीतच मराठी विकिपीडियाकडे 'शोकेस' करण्याजोगे काही लेख त्या-त्या विषयांत असतील आणि असे लेख आपण जर त्या-त्या क्षेत्रांतील तज्ञांना दाखवू शकलो तर 'मराठी विकिपीडिया'चा उद्देश पटवून या मंडळींकडून योगदान मिळवणे जमू शकेल असे वाटते.
बाकी, अभय, तुम्ही लिहिलेल्या शुद्धिकरणयोग्य लेखांच्या यादीतील लेख एकेक करून तपासावे लागतील - लेखनशुद्धी आणि माहितीच्या तथ्यतेकरतादेखील. तूर्तास संबंधित साहित्य माझ्यापाशी उपलब्ध असल्याने मला प्रश्नोपनिषद्‌ हा लेख तपासणे शक्य होईल.
--संकल्प द्रविड 19:33, 19 नोव्हेंबर 2006 (UTC)

English Wikipedia वरील नवीन "Userbox"[संपादन]

इंग्लिश विकिपिडियावर मी http://en.wikipedia.org/wiki/Template:User_wikimr येथे नवीन "Userbox" (पर्यायी मराठी शब्द?) तयार केला आहे, शिवाय मराठी विकिपिडीयावर काम करणार्या लोकांची नवीन "category" तयार केली आहे. मला असे वाटते की इंग्लिश व मराठी विकिपिडिया दोन्हीकडे काम करणार्या व्यक्तींनी जर हा "Userbox" तेथे वापरला, तर मराठी विकिपिडीयाची माहिती अधिक लोकांस मिळेल, व अधिक लोक येथे मदतीस येतील. जर याचा खरेच उपयोग होणार असल्यास ही माहिती मी इतरांपर्यंत कशी पोहोचवू शकेन ह्याची माहिती मला मिळाली तर मी त्याप्रमाणे काम करू शकेन.

Fleiger 04:09, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)

मीडियाविकीमध्ये मराठी भाषा का नाही?[संपादन]

नमस्कार,

माझी एक स्वत:ची विकी आहे ज्यात मी मराठी लेख लिहितो, पण विकीचा इंटरफेसही मला मराठीत हवा आहे... ह्या मराठी विकिपीडियासारखा. पण मीडियाविकी प्रस्थापित करताना भाषा विकल्पांमध्ये मराठी दिसत नाही. कारण असावे की "languageMr.php" ही फाईल मीडियाविकीच्या संचात उपलब्ध नाही. तुम्ही लोकांनी अर्थातच ती फाईल बनवली असणार मराठी विकिपीडियासाठी.तेव्हा, ती फाईल मला मिळू शकेल का? आणि, त्याहूनही महत्त्वाचे... मीडियाविकीच्या संचात हिंदी, बंगाली, काश्मिरी, आणि इतर अनेक भाषा उपलब्ध असताना, मराठीच तेवढी का नाही?

--हृषीकेश 20:21, 4 नोव्हेंबर 2006 (UTC)

Sherlock Holmes[संपादन]

Sherlock Holmes चा उच्चार "शरलॉक" असा केला जात असल्याने मी त्या नावाने पान बनविले होते.

तसेच, "अंतू बर्वा" हा संपूर्ण लेख सध्या विकिबूक्स वर असून त्याचा दुवा "व्यक्ती आणि वल्ली" ह्या लेखात आहे. हा लेखावर मौज प्रकाशन आणि पु ल देशपांडे फाऊंडेशन ह्यांचा copyright आहे. त्यामुळे ह्या लेखाचा दुवा काढून टाकावा असे माझे मत आहे.

ह्या दोनही बाबतीत विकिपिडीयाचा काय संकेत आहे?

तसेच Detective ला मराठी प्रतिशब्द न सापडल्याने मी "सत्यान्वेशी" हा ब्योमकेश बक्क्षी कथांमध्ये वापरलेला शब्द वापरत आहे. मला गुन्हे अन्वेषकापेक्षा हा शब्द अधिक सुयोग्य वाटतो. तरी Detective ला मराठी प्रतिशब्द असल्यास कळवावे.


Fleiger 22:51, 5 नोव्हेंबर 2006 (UTC)

संयुक्त महाराष्ट्र चळवळ[संपादन]

लेख सुरक्षित केल्याबद्दल धन्यवाद.महाविकी 02:28, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)

Translation Request[संपादन]

Greetings अभय नातू!

I know that you are not a Christian, but can you kindly help me translate this article: येशु ख्रिस्त into the Marathi language - Please?

Any help would be gratefully appreciated, Thankyou. --Jose77 02:13, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)

Thanks for Help[संपादन]

Thanks for your valuable help in correcting table at article Mahitgar 01:38, 9 नोव्हेंबर 2006 (UTC)

Request for Template Protection[संपादन]

I would like to request you to provide semi-protection to IPA and Unicode Templates.This to avoid changes by mistakes from new or unknown users. "Template:IPA" "Template:Unicode " These Templates are protected templates even on English Wikipedia. Regards Mahitgar 09:40, 9 नोव्हेंबर 2006 (UTC)

Misc/uncategorized messages[संपादन]

Just now I entered Sidney Sheldon's Book list, Could you please put it back. Thanks Mandar Patil

I just tried to give "chitrapaT" link for सुप्रिया पिळगावकर page. but it is showing as "gammat jammat, chitrapat". chitrapat word should be hidden... isn't it?

also how to change to निवेदिता from निवेदीता everywhere? thanks, chhoo.


सुप्रिया पिळगावकर che paan सुप्रिया पिळगांवकर yethe move karaal kaay? baakIchya thikaaNI mee change karato.

dhanyavaad chhoo


मला साचा बनवायला नक्की आवडेल.. पण तो कसा बनवतात याची माहिती कुठे मिळेल? सध्या मी तेच html वापरले आहे--छू 20:36, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)


आपण बनवलेल्या साच्यामध्ये प्रमुख अभिनेते या सदरात सचिन पिळगांवकर नावापुढे बुलेट न येता अस्टेरिस्क येत आहे?? साचा अतिशय उपयुक्त आहे. धन्यवाद--छू 21:08, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)

चंगीझ खान या लेखात Contents असा तक्ता आला आहे. मात्र मी संपादित करत असलेल्या कार्ल मार्क्स या लेखात असा तक्ता येत नाही. याबद्दल काय करावे? धन्यवाद --छू 20:42, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)

सप्तर्षी[संपादन]

सप्तर्षीमधील सात ऋषी कोणते? इंग्लिश विकिपीडियावर वेगवेगळे संदर्भ देउन वेगवेगळ्या याद्या दिलेल्या आहेत. पैकी कोणती यादी बरोबर?

अभय नातू ०४:५८, ३ जून २००७ (UTC)


इंग्रजी विकिपीडियातील माहिती बव्हंशी बरोबर आहे. प्रत्येक मन्वंतरात वेगवेगळे सप्तर्षी आहेत. वैवस्वत मन्वंतरात व खालील ग्रंथात अत्री, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ(ष्ट नाही), विश्वामित्र हे सप्तर्षी सांगितले आहेत.: ऋग्वेद-सर्वानुक्रमणी(१४.४), शतपथ ब्राह्मण, बृहदारण्यक उपनिषद, महाभारत-शल्यपर्व(भांडारकर प्रत ४७.२८७), महाभारत-शांतिपर्व(२०१.२६)...

आपटे वगैरे शब्दकोशांमध्ये,महाभारत-शंतिपर्व(३२२.२७), बृहत्संहिता व ज्योतिर्विज्ञानामध्ये धृवाजवळ उत्तर दिशेला असलेल्या सात तार्‍यांची नावे इंग्रजी विकीपीडियाप्रमाणेच अत्री, अंगिरस, क्रतु, पुलस्त्य, पुलह, मरीची, वसिष्ठ अशी दिली आहेत.

याशिवाय बाकीच्या तेरा मन्वंतरातील तेरा याद्या व ऋग्वेद सर्वानुक्रमिणिकेत(९.१०७.१-२६, १०.१३७.१-७) दिलेली आणखी एक यादी, पूर्व-पश्चिम-दक्षिण या बाकीच्या दिशांना असलेल्या(?) तार्‍यांची नावे अशा सप्तर्षीच्या बर्‍याच याद्या आहेत. विस्तारभयास्तव या याद्या इथे दिलेल्या नाहीत. कुणा जिज्ञासूला हव्या असतील तर देता येतील. वर दिलेली ऋषींची व तार्‍यांची नावे आपण विकिपीडियासाठी सप्तर्षी म्हणून प्रमाण मानावीत असे मला वाटते. --J--J १४:४५, ४ जून २००७ (UTC)