Jump to content

सदस्य चर्चा:Gypsypkd/जुनी चर्चा ३

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा लावला. मी आपला आभारी आहे. साचा खुपच सुंदर झाला आहे. त्यास साचाचे रुप द्यावयास हवे असे मला वाटते.मला त्याविषयी ज्ञान अपूरे आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:३६, १९ मार्च २०१० (UTC)

टिमकी वगैरे छोटी गोष्ट झाली, तुम्ही सांगा तर मोठ्ठा ढोल बडवु. चिंताच नको. मेहनतीला आपण कुठेच मागे पडत नाही.

वि. नरसीकर (चर्चा) १०:२१, २१ मार्च २०१० (UTC)

अरे व्वा! माझे तिकडे लक्षच नव्हते. धन्यवाद. मी आपला शतशः आभारी आहे.पार्टी कधीही. आपण म्हणाल तेंव्हा व तिथे.

वि. नरसीकर (चर्चा) १२:०३, २१ मार्च २०१० (UTC)


निम हकीम खतरे जान-अशी एक म्हण आहे. फ्लॅट शेजारी एक झाड आहे. पक्षी दिसत नव्हता. आवाज ऐकु येत होता.तो कोकीळ/कोकीळेचा आहे हे समजले. रेकॉर्ड केला व टाकला.आपला अनुभव जमेस धरता आपण म्हणता ते बरोबरच असेल.आवश्यक ते बदल करतोच आहे. चुकीच्या दुरुस्तीबद्दल असंख्य धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:११, ५ एप्रिल २०१० (UTC)


अन्योक्ति

[संपादन]

या नावाचा एक कविताप्रकार असायचा. आमच्या लहानपणी शिकलेला. त्याचे नाव 'कोकिलोन्योक्ति'-

येथे समस्त बहिरे बसतात लोक
कां भाषणे मधुर तु करिशी अनेक ...............(ओळ आठवत नाही.) कोकिल वर्ण बघुनी म्हणतील काक.


कोकिळेच्या निमित्याने हे आठवले.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:३३, ५ एप्रिल २०१० (UTC) वि. नरसीकर (चर्चा) ०८:३३, ५ एप्रिल २०१० (UTC)


पानफुटी

[संपादन]

कृपया हेमसागर हा लेख बघावा.पानफुटी व हेमसागर एकाच वनस्पतीची दोन नावे आहेत.

वि. नरसीकर (चर्चा) ०५:११, १४ एप्रिल २०१० (UTC)

प्रबंधक

[संपादन]

आपण माझेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.असाच लोभ कायम असु द्यावा ही विनंती.

यात माझी भूमिका अशी आहे:

१) मला साच्यांचे ज्ञान नाही जे विकिपीडियाचा एक आधारस्तंभ आहेत.त्या बाबतीत मी कमी पडतो.त्यात पारंगतता हवी असे माझे मत आहे.कोणी प्रश्न केल्यास त्याचे उत्तर देता यायला हवे. २) जरी माझे वाचन जास्त असले तरी माझे मराठीचे ज्ञान फक्त ७वा वर्ग पास ईतकेच आहे.(नंतर ईंग्रजी माध्यम.)मी शुद्धलेखनात कमी पडतो.माझ्या त्यात अनेक चुका होतात. नविन शुद्धलेखनाचे नियम मला अवगत नाहीत.(व मला ते अवगत करुन घ्यायचेही नाहीत-आता काही नविन शिकायची इच्छा नाही.विनाकारण डोक्यात गोंधळ होतो.) ३) वर्गवारीबद्दल थोडे-थोडे शिकत आहे.तीच जरा बर्‍यापैकी येते. ४) माझ्यामागे इतरही काही व्याप आहेत. ते आटोपुन इकडे पूर्णपणे लक्ष देणे शक्य होणार नाही. ५) अजुन नोकरी सुरु आहे.पोटापाण्याचे काम प्रथम.त्यामुळे मी 'प्रबंधकाच्या' पदास पूर्ण न्याय व आवश्यक वेळ देउ शकणार नाही.सध्या जसा जसा वेळ मिळतो तसे तसे काम करतो.नेहमी उपलब्ध राहीलच असे नाही. ६) 'मराठी' साठी विकिपीडियावर कामच करायचे तर ते कोणत्या पदाविनाही करता येते.त्यात कोणाची तक्रार वा आडकाठी नाही.(आवश्यक ते नियम पाळुन शक्यतोवर मी तसा प्रसंगच येउ देत नाही).येथील सर्व लोकं चांगल्या व मोठ्या मनाचे आहेत अशी माझी धारणा आहे.

वरील सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार केला तर मी या पदासाठी पात्र ठरत नाही.मी आपले मन मोडत आहे याविषयी मला विषाद वाटतो.पण माझा नाइलाज आहे.आपल्या भावना दुखविणे हा यामागील हेतु नाही हे पण स्पष्ट करतो.

आपण माझेबद्दल दाखविलेल्या आत्मियतेसाठी पुनश्च एकदा आभार.खरेतर आभार मानावयास नकोच-प्रेमसंबंधात व मित्रत्वात आभार मानायचे नसतात असा संकेत आहे म्हणे.असो.क. लो.का.ठे.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:२१, २७ एप्रिल २०१० (UTC)

सापुतारा

[संपादन]

माफ करा. मी आपली पानकाढा विनंती काढुन हा लेख बनविला.तेवढ्याच एका लेखाची भर पडते म्हणुन.मला वाटते, आपणास यात हाही वावगे वाटुन गैरसमज नको म्हणुन हा लेखन प्रपंच.

वि. नरसीकर (चर्चा) ११:४७, ५ मे २०१० (UTC)

आपला संदेश वाचला. त्यात इतके वाईट वाटुन घेउ नका.मला माहित असण्याचे कारण, एकदा मी सुरतहुन सापुतारा मार्गे नाशिकला आलो होतो.बस. त्यावरुनच मी गुगल सर्च मध्ये ते नाव टाकले व माहिती गोळा केली.नंतर इंग्रजी विकिपीडियात शोध घेउन फोटो टाकले. माझेपाशी गुगल अर्थ पण आहे.त्यात ही बघितले. असो.

प्रत्येकाचे एक क्षेत्र असते,त्यात तो पारंगत असतो. आम्हाला पक्षांबाबत ज्ञान अपूरे आहे.तो आपला प्रांत आहे.त्यात आपण पारंगत आहात. कोकीळ वरुन आपल्या लक्षात आलेच असेल.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:१७, ६ मे २०१० (UTC)

चिंतामणी

[संपादन]

चिंतामणीचा फोटो सुंदरच हं ! नागपूरच्या टेकडीच्या गणेशाबद्दल माझ्याकडे अपूरी माहिती आहे. तोच एक लेख राहिला आहे या माळेत.माहिती जमवित आहे. लवकरच पूर्ण करतो. तसेच यांच्या फोटोचीपण व्यवस्था करेन म्हणतो. सध्या व्यस्तता आहे म्हणुन जमत नाही. लवकरच करेन. वि. नरसीकर (चर्चा) ०८:१२, १० मे २०१० (UTC)

पोटा-पाण्याच्या व्यवसायात थोडा व्यस्त झालो आहे. सोबत शैक्षणीक संस्थातून भेटी देऊन विकिपीडीया बद्दल जराशी चर्चा करण्याची संधी मिळाली. पण कार्यशाळा घेण्याची संधी अजून पर्यंततरी मिळाली नाही.
विकिसाठी सहभाग हा विषय मांडून पक्षीमित्र संमेलनची माहिती चावडीवर देता येईल.तसेच याहू, आर्कूट ग्रूपवरही बरेच मेंबर्स आहेत तिथेही माहिती देता येईल.
संदर्भानुसार जन्म दिनांक बदलता येईल माहितगार ०५:२४, १४ मे २०१० (UTC)