Jump to content

अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अखिल भारतीय संत साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)

अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन हे पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने इ.स. २०१२ पासून भरविले जाते.

  • पहिले अखिल भारतीय मराठी संतसाहित्य संमेलन नाशिक येथे २६ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. संमेलनाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.
  • १६ ते १८ फेब्रुवारी इ.स. २०१३ दरम्यान नेरूळ नवी मुंबई येथे दुसरे संत साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष अभय टिळक हे होते.[]
  • तिसऱ्या अखिल भारती मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माणिकमहाराज गुट्टे होते. हे संमेलन शेगावला झाले होते.
  • चौथ्या संमेलनाचे अध्यक्ष आळंदीचे डॉ. शिवाजीराव मोहिते होते. हे संमेलन नांदेड येथे ७ ते ९ फेब्रुवारी २०१५ या काळात झाले होते.
  • पाचवे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन २१ ते २३ मे २०१६ या दरम्यान पुण्यात झाले. बद्रीनाथ महाराज तनपुरे संमेलनाध्यक्ष होते.
  • ६वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन लातूर येथे २९ ते ३१ मे २०१७ या काळात झाले. गहिनीनाथ महाराज औसेकर हे संमेलनाध्यक्ष होते.
  • ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथ १५ ते १७ फेब्रुवारी २०१८ या काळात झाले. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे संमेलनाध्यक्ष होते.

महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे ता. २९ ते ३१ मे २०१७ या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर होते.वारकरी साहित्य परिषद व डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानद्वारा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी भोर येथे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील जगदगुरू द्वाराचार्य ह.भ.प.डॉ.रामकृष्णदासदेवाचार्य लहवितकर महाराज होते.

  • वारकरी साहित्य परिषद (महारष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान (नागपूर) यांच्यातर्फे ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी-भोर येथे १५-१६-१७ फेब्रुवारी २०१८ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर होते.

१५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले होते. या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले .दिंडी सोहळ्याचा शुभारंभ पशुसंवर्धन,दुग्ध,मत्सविकास कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाला..या संमेलनात महाराष्ट्रातील संत परंपरा,संत साहित्याची सामाजिक फलश्रुती आदी विषयांवर परिसंवाद होणार आहे.खुली भजन स्पर्धादेखील पार पडल्या.शुक्रवार दि १६ रोजी संत साहित्यात स्त्री संताची भूमिका, झाडीपट्टी रंगभूमीची संतावरील नाट्य संपदा व सामाजिक समता, विदर्भातील संतांची सामाजिक जागृती आदी विषयावर परिसंवाद तर शनिवार दि.१७ रोजी बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या काल्याच्या कीर्तन व सांगता समारोप व सत्कार सोहळा झाला.यावेळी उपस्थितांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वारकरी विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आले. त्यांच्या संस्थेचे सरचिटणीस जनार्दन बोथे ह्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यासोबत संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी बापूसाहेब देशमुख यांना जीवनगौरव, विशेष कार्य पुरस्कार हभप बाबा महाराज राशनकर, हभप माधव महाराज शिवणीकर यांना देण्यात आला. .सामाजिक व न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात येणार पहिला संत चोखामेळा पुरस्कार देऊन सप्त खंजिरीवादक हभप सत्यपाल महाराज यांना ५१ हजार रु.रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या संमेलनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी पुणे व जिल्हा नियोजन मंडळ,गोंदिया यांचा विशेष सहभाग होता.

  • ८ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोल्हापूर येथे दि. २८ ते ३० डिसेंबर २०१९ या काळात आयोजित करण्यात आले होते.

याच नावाची आणखी संमेलने

[संपादन]
  • ‘अखिल भारतीय आणि ‘मराठी’ हे शब्द नसलेले ‘संत साहित्य संमेलन’ नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराज विश्वस्त मंडळ आणि संत नामदेव महाराज वारकरी पंथ विचार प्रसारक मंडळ, अमरावतीच्या संत नामदेव महाराज साहित्य परिषद, संत गाडगे महाराज समाधी मंदिर संस्थान, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ (गुरुकुंज आश्रम), अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ या संस्था, नांदेडचे संत नानक साहब फाउंडेशन आणि पुण्याचे गुरुकुल प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने २३-२५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या गावी झाले. डॉ. अशोक कामत संमेलनाध्यक्ष होते.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "जीवनमूल्ये संतविचाराचा गाभा!". १४ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

मराठी साहित्य संमेलने, संत साहित्य संमेलन