संत साहित्य संमेलन
Appearance
ही अनेक आहेत. त्यांमधली संत साहित्य संमेलन, जागतिक संत साहित्य संमेलन, बहुजन संत साहित्य संमेलन, मराठी संत साहित्य संमेलन, विश्व संत साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन, सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन, गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन, तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन, राष्ट्रसंत विचारकृती संमेलन ही महत्त्वाची संमेलने आहेत.
- अखिल भारतीय आणि ‘मराठी’ हे शब्द नसलेले ‘संत साहित्य संमेलन’ नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराज विश्वस्त मंडळ आणि संत नामदेव महाराज वारकरी पंथ विचार प्रसारक मंडळ, अमरावतीच्या संत नामदेव महाराज साहित्य परिषद, संत गाडगे महाराज समाधी मंदिर संस्थान, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ (गुरुकुंज आश्रम), अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळ या संस्था, नांदेडचे संत नानक साहब फाउंडेशन आणि पुण्याचे गुरुकुल प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने २३-२५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या गावी झाले. डॉ. अशोक कामत संमेलनाध्यक्ष होते.
- वारकरी साहित्य परिषद (महारष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान (नागपूर) यांच्या तर्फे ७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी-मोरगांव येथे १५-१६-१७ फेब्रुवारी २०१८ या काळात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर होते..
- पहिले सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन हे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे २०१२ साली झाले होते. फकरुद्दीन बेन्नूर संमेलनाध्यक्ष होते.