Jump to content

प्रभानवल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रभानवल्ली हे गाव रत्‍नागिरी जिल्ह्यात,लांजा तालुक्यात वसलेले गाव आहे.

  ?प्रभानवल्ली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा लांजा
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४१६७०१
• एम एच०८

भुगोल

[संपादन]

हे गाव कोर्ले तिठ्यापासून उजवीकडे सुमारे ५ किमीवर आहे. लांजा बसस्थानकातून प्रभानवल्ली-खोरनिनको,हर्दखळे,भांबेड,शिपोशी,साखरपा, ह्या ठिकाणी जाणाऱ्या एसटी बसेसने येथे जाता येते.खोरनिनको बसने थेट प्रभानवल्लीला जाता येते तर अन्य बसेस कोर्ले तिठ्यावर थांबतात तिथून पायी, सायकल,मोटारसायकल इत्यादी वाहनाने आपण पुढे जाऊ शकतो.

गावाच्या मधून मुचकुंदी नदी वर्षभर वाहत असते. पावसाळ्यात ती उग्र रूप धारण करते.

लोकजीवन

[संपादन]

येथील लोक मुख्यतः शेती करतात. भात, नागली ही मुख्य पीके घेतली जातात. काजू, फणस, आंबा,कोकम ही झाडे येथे विपुल प्रमाणात आहेत आणि हंगामात त्यांचे भरपूर प्रमाणात उत्पादन घेतले जाते.साग, देवदार,ऐन, शिसवा इत्यादी जंगली झाडेही येथे भरपूर आहेत.लोक कष्टाळू, प्रेमळ, साधे, समाधानी,मेहनती आहेत. येथे गायी म्हशी पाळून जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय ही केला जातो.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

नागरी सुविधा

[संपादन]

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादी साठी बँक वित्त पुरवठा करते.

जवळपासची गावे

[संपादन]

केळवली, नामे, पालू, बाणखोर, खोरनिनको, भांबेड, हर्दखळे, कुडेवाडी, वाघणगाव, विलवडे, मोगरगाव ही जवळपासची गावे आहेत.प्रभानवल्ली ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[]

संदर्भ

[संपादन]

१. https://www.facebook.com/prabhanvallilanja/ २. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ ३. http://tourism.gov.in/ ४. https://www.census2011.co.in/census/state/maharashtra.html

  1. ^ /https://www.bankofindia.co.in/
  2. ^ #https://villageinfo.in/maharashtra/ratnagiri/lanja.html