मेहबूबा मुफ्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेहबूबा मुफ्ती

कार्यकाळ
४ एप्रिल २०१६ – १९ जून २०१८
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील राष्ट्रपती राजवट

विद्यमान
पदग्रहण
२०१४
मागील मिर्झा मेहबूब बेग
कार्यकाळ
२००४ – २००९
मागील अली महंमद नाईक
पुढील मिर्झा मेहबूब बेग

जन्म २२ मे, १९५९ (1959-05-22) (वय: ६४)
अनंतनाग जिल्हा, जम्मू आणि काश्मीर
राजकीय पक्ष जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (१९९९ - )
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९९ पर्यंत)
वडील मुफ्ती महंमद सईद
धर्म मुस्लिम

मेहबूबा मुफ्ती सईद ( २२ मे १९५९) ही भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाची अध्यक्ष आहे. वडील मुफ्ती महंमद सईद ह्यांच्या मृत्यूमुळे एप्रिल २०१६ मध्ये सत्तेवर आलेली मेहबूबा मुफ्ती राज्याची पहिलीच महिला मुख्यमंत्री होती. २०१८ साली भारतीय जनता पार्टीने पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुफ्तीला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने भारतीय संविधानाचे कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा काढून घेतला व जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवले. तेव्हा कायदा व सुव्यवस्थेसाठी मेहबूबा मुफ्तीला अनेक काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते.