क्षमा वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. क्षमा वैद्य या मराठी संगीत नाटक अभिनेत्री आहेत. या व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर आहेत.

वैद्य यांचा जन्म पुण्यात झाला. शिक्षण नूतन मराठी विद्यालयहुजुरपागा या शाळांत झाले. आजोबा कीर्तनकार होते आणि आईला संगीताची आवड होती. त्यामुळे क्षमा वैद्य यांनाही संगीत व अभिनयामध्ये रुची निर्माण झाली.

संगीताचे शिक्षण[संपादन]

डॉ. क्षमा वैद्य यांनी गांधर्व महाविद्यालयात संगीताचे प्राथमिक धडे घेतले; तसेच भेंडीबाजार घराण्याचे पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे त्यांचे संगीत शिक्षण झाले. स्वरराज छोटा गंधर्व, संजय देशपांडे, विष्णूपंत वष्ट व बंधू डॉ. दिग्विजय वैद्य यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

अभिनयाची कारकीर्द[संपादन]

त्यांनी भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेच्या संगीत शाकुंतल या नाटकात त्यांनी शकुंतलेची भूमिका केली. संस्थात्मक पातळीवरील हे त्यांचे पहिले संगीत नाटक होते. त्यानंतर त्यांनी ’भरत’ची अनेक नाटके केली.

डॉ. क्षमा वैद्य यांची भूमिका असलेली नाटके[संपादन]

  • कट्यार काळजात घुसली
  • प्रीतिसंगम
  • मानापमान
  • मृच्छकटिक
  • संशयकल्लोळ
  • सौभद्र
  • स्वयंवर
  • ययाती देवयानी

नाट्यसंस्था[संपादन]

एकीकडे उत्तम असे काम अभिनेत्री गायक म्हणून करत असतानाच क्षमा वैद्य यांना स्वतःचे वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी होती. त्यातूनच त्यांनी १९९५मध्ये गोविंदराव दाते यांच्या सहकार्याने 'शिवरंजनी नाट्यगंगा' ही स्वतःची संस्था निर्माण केली. संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार सर्व महत्त्वाच्या संगीत नाटकांना त्यांनी पुन्हा रंगमंचावर आणले. वेगळ्या पद्धतीने त्यांनी ही नाटके सादर केली.

पुरस्कार[संपादन]

  • महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार
  • फाय फाउंडेशनचा पुरस्कार
  • पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार