वाफळे शिलालेख
Appearance
वाफळे शिलालेख हा सोलापूर जिल्ह्यातील वाफळे येथे असलेल्या एका जुन्या मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीजवळ आहे.[१] याची भाषा संस्कृत असून इ.स.च्या बाराव्या शतकातील नागरी लिपी आहे. या शिलालेखाचा उद्देश यादव सिंघणाच्या नोकरीत असलेल्या नारण (नारायण) नामक व्यक्तीच्या नातवाने उपल येथील तेजेश्वराच्या मंदिराला दिलेल्या निरनिराळ्या देणग्या नमूद करणे हा होता. जैत्रपालाच्या राजवटीत दिलेल्या देणग्या कायम केल्याचा उल्लेखही या शिलालेखात केलेला आहे. विवेकसिंधु ग्रंथ लिहिणारा प्रसिद्ध मराठी आद्यकवि मुकुंदराज हा याच जैत्रपालाच्या पदरीं होता असे म्हणले जाते.[२]
शिलालेखात आलेली व्यक्तिनामे
[संपादन]- मल्लि (मालुगी) – यादव राजा
- अमर गांगेय – यादव राजा, मल्लिचा पुत्र
- बल्लाळ – यादव राजा
- भिल्लम – यादव राजा
- जैत्रपाल – यादव राजा, भिल्लमाचा पुत्र
- सिंघण – यादव राजा, जैत्रपालाचा पुत्र
- विश्वनाथ – सिंघणाचा सेवक
- नारण (नारायण) – विश्वनाथाचा पुत्र
- हरिहर – नारण (नारायण) याचा पुत्र
- दिनू नायक – जैत्रपालाचा अधिकारी
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ ग.ह. खरे. दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने. p. ६६ – ७२. 2020-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.
- ^ श्रीधर व्यंकटेश केतकर. यादववंश (देवगिरीचा). महाराष्ट्रीय ज्ञानकोश. ११ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.