होमाई व्यारावाला
होमाई व्यारावाला (जन्म-९ डिसेंबर १९१३, मृत्यू-१५ जानेवारी २०१२) : भारतातल्या पहिल्या महिला छायाचित्र पत्रकार. १९३८ मध्ये त्यांनी छायाचित्रव्यवसायाला प्रारंभ केला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वात पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची छायाचित्रे घेतली; तसेच स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना, घडामोडींची छायाचित्रे टिपली.[१] २०११ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
होमाई व्यारावालांचा जन्म गुजरातमधील नवसारी येथे एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. आपल्या एका मित्राकडून त्यांनी छायाचित्रकला शिकली. १९४१ मध्ये त्यांनी त्याच्याशी विवाह केला. १९४२ मध्ये त्या दिल्लीला वास्तव्यासाठी गेल्या. ज्याकाळात भारतातील महिला कारकीर्द करताना दिसत नसत अशा काळात होमाई व्यारावालांनी छायाचित्रपत्रकार म्हणून नव्या क्षेत्रात धाडसाने प्रवेश केला, आणि कारकीर्द यशस्वी केली. त्यांचे पती माणेकशॉ व्यारावाला यांचे १९७० मध्ये निधन झाले त्यानंतर अल्पावधीतच त्या व्यावसायिक छायाचित्रकारीतून निवृत्त झाल्या आणि वडोदरा येथे १९७३ मध्ये कायमच्या वास्तव्याला गेल्या.[२]
घरातल्या किरकोळ अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे १५ जानेवारी २०१२ रोजी निधन झाले.
संदर्भ
[संपादन]- ^ बी.बी.सी. मराठी. "आज गूगल डूडलवर आलेल्या पहिल्या भारतीय महिला फोटोग्राफर कोण होत्या?". बी.बी.सी. मराठी. ९ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ द हिंदू मधील बातमी [१]
मृत्यू [संपादन]
जानेवारी 2012 मध्ये, व्य्यावलाने आपल्या बेडवरून खाली पडली आणि हिप हाड मोडला. तिच्या शेजार्यांनी तिला तिच्या एका रुग्णालयात पोहचण्यास मदत केली होती जिथे ती श्वासोच्छवासाची गुंतागुंत झाली. 15 फेब्रुवारी 2012 रोजी सकाळी 10.30 वाजता तिचा मृत्यू झाला होता.