बाल्टिक भाषासमूह
Appearance
बाल्टी भाषा याच्याशी गल्लत करू नका.
बाल्टिक हा इंडो-युरोपीय भाषासमूह ह्या भाषाकुळामधील बाल्टो-स्लाव्हिक ह्या शाखेमधील एक उपवर्ग असून ह्यामध्ये मुख्यत: उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या पूर्वेकडील भूभागामधील भाषा गणल्या जातात. आजच्या घटकेला बाल्टिक समूहामधील लिथुएनियन व लात्व्हियन खेरीज इतर सर्व भाषा लुप्त झाल्या आहेत. ह्या दोन भाषा अनुक्रमे लिथुएनिया व लात्व्हिया ह्या दोन बाल्टिक देशांच्या राष्ट्रभाषा आहेत.
शाखा
[संपादन]पश्चिम बाल्टिक †
[संपादन]- गालिंडियन भाषा †
- जुनी प्रशियन भाषा †
- सुडोव्हियन भाषा †
पूर्व बाल्टिक
[संपादन]- लिथुएनियन
- लात्व्हियन
- सेनोलियन भाषा †
- सेमीगालियन भाषा †
- जुनी कुरोनियन भाषा †
(† - लुप्त भाषा)