महाराष्ट्रातील स्थलनामे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख महाराष्ट्रातील स्थलनावांची केवळ जंत्री नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आणि भाषाशास्त्रीय व्युत्पत्तींवर आधारित लेख आहे.

महाराष्ट्रातील स्थलनामांचा अभ्यास हा महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रीय संस्कृती यांच्या अनुषंगाने करावा लागतो. या लेखातमराठी भाषेवर इतर इंडो-आर्यन आणि द्रविडी भाषाकुळांचा झालेला प्रभाव विचारात घेऊन महाराष्ट्रातील स्थलनामांच्या व्युत्पत्तीचा शोध घेतला आहे.. अनेक महाराष्ट्रीय आडनावे स्थलनामावरून आलेली आहेत.

महाराष्ट्र या नावाचा उगम तसेच इतर काही स्थलनामांचा उगम हा महाराष्ट्रातील इतिहासकालीन जाती संस्थेत आणि पंथ संप्रदायातही असल्याचे काही संशोधक मानतात.


ग्रामनामे[संपादन]

महाराष्ट्रात दोन प्रकारची ग्रामनामे आढळून येतात. एक प्रत्यय लागून बनलेली, एक प्रत्यय नसलेली, अथवा कालौघात प्रत्यय गळून पडलेली. इसवी सनाच्या पाचव्या शतकापूर्वीची नावे बहुधा प्राकृत भाषेत होती. पाचव्या शतकानंतर ग्रामनामांवर संस्कृत भाषेचा प्रभाव दिसून येतो.

राजवाड्यांनी गावांच्या नामाभिधानाचे चार प्रकार सांगितले आहेत. ते असे: १) मनुष्येतर-प्राणिनामजन्य ग्रामनामे २) मनुष्ये, देवता, जाति, लोक यांच्या नावावरून निघालेली ग्रामनामे ३)निर्जीव पदार्थांपासून निघालेली ग्रामनामे ४) मुसलमानी ग्रामनामे.

नद्या, डोंगर आणि डोंगरबाऱ्या यावरून बनलेल्या काही गावांची वेगळी नोंद त्यांनी केली आहे.[१]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


छोटी वस्ती[संपादन]

गृह, घर, वाडा, गढी, हे शब्द ही व्यक्तिगत मालमत्तेस वापलेले असतात. त्यावरून (आ)गार, वाडी इत्यादी प्रत्यय छोट्या वस्त्यांकरिता बनल्याचे आढळून येते. आळ/आळी,चाळ, इत्यादी प्रत्यय गल्ली या अर्थाने वापरले जातात.

ग्रामनामे रूढ होताना लागणारे प्रत्यय[संपादन]

पूर, ग्राम इत्यादी प्रत्यय संस्कृतातून आल्याचे दिसून येते. काही महाराष्ट्रीय तज्ञांच्या मते पुरा या प्रत्ययावरूनच ऊर (पूरचे वूर वूरचे ऊर) हा प्रत्यय आला असावा [२]परंतु सुमेरियन या प्राचीन भाषेत ऊर या शब्दाचा अर्थ स्पष्टपणे ग्रामनाम/स्थलनाम असाच आहे. तोच तेथून अवेस्तन-पर्शियन भाषेत आला असावा. येते[३].[४].तर महाराष्ट्रीयन ग्रामनामातील palli, ur, veli, cheri, patti, kuppam, padi, neri, vayal, vani (wani), vali and wadi. Toponym kaḷḷūr, प्रत्यय द्राविडी किंवा तमीळ भाषेतील असून सिंधू संस्कृती ते दक्षिण भारत अशा द्राविडी स्थलांतराच्या त्या खुणा असल्याचे द्राविडी/तमीळ भाषातज्ज्ञांचे मत आहे.[५]


ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


There are 71 place names in Maharashtra with 'Palli' as suffix. Kurumpalli, Singampalli, Arkapalli, Chirepalli and Tekampalli can be cited as few examples. As many as 119 place names with 'Ur' as suffix can be identified which include names such as Karur, Anjur, Manur, Penur, Anur, Yelur, Alur, Kallur, Telur, Illur, Sellur, Malur, Madur, Badur and so on.

12.1 Besides, there are place names such as Karkudi, Torankudi, Cholai, Malai, Mahalkadu, Chakadu, Manurwadi, Yelwadi, Kandarwadi, Tamalwadi, Telengwadi, Tandalwadi, Cheravali, Tekavali, Kudavali, Narivali, Kudavali, Vayal, Neri, Shivaneri, Atpadi, Karpadi, Parainar (Parainad), Italnar (Italnad), Akkarpatti, Sundarpatti and many such place names that occur in Maharashtra confirm that place names in Maharashtra, where archeological evidence for late Harappan culture has been found , provide the essential link between the late Harappan cultures and the Dravidian south.


गाव,वाडी, पाडा/पाडे/पाडी(आटपाडी), टोले,पाल, 'उर','पूर','पुरी', नगर, ठाणे, ऐठण, नेर/नेरी (नेर,अमळनेर पारनेर,शिवनेरी,बडनेरा,नेरळ महाराष्ट्राबाहेर बिकानेर. नेर शब्दाची व्युत्पत्ती गोविंद शंकरशास्त्री बापट यांच्या व्युत्पत्ति-प्रदीप‘ ग्रंथात या नेहर‘ (कालवा) यावरून दिली आहे. [६] तर इतिहासाचार्य राजवाडेंनी ती ‘ नीवर या शब्दापासून सांगीतली. नीवर म्हणजे वसती करण्यास योग्य प्रदेश. निवाऱ्याचे ठिकाण.) [७]) ,वन(मालवण),वली (कणकवली) ,बाद,बाग (अलीबाग)


प्रत्यय रुळ: जरुळ ,वेरुळ, परुळ, बारुळ,मारुळ,नेरुळ, प्रत्यय रोळ: सगरोळी

खानदेश[संपादन]

वसाहतकालीन इतिहासाच्या गावांच्या नावाचा माग काढण्यासाठी त्यांनी खानदेशची निवड केली. राजवाड्यांच्या दृष्टीकोनातून खानदेश म्हणजे - पश्चिमेस खांडवा, पूर्वेस खांडबारी, उत्तरेस नर्मदा व दक्षिणेस नाशिक एवढा प्रदेश. त्यावेळी खानदेशात पश्चिम खानदेश व पूर्व खानदेश असे दोन जिल्हे होते. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बागलाण व मालेगाव या नाशिक जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश होता. हा टापू हवा, पाणी, भाषा इत्यादी बाबतीत एकजिनसी आहे. या टापूत सुमारे चार हजार गावे असल्याचेराजवाडे म्हणतात. त्यापैकी सुमारे एक हजार गावे सन १८६५ च्या सुमारास पडीक होती. उर्वरीत गावांचे राजवाड्यांनी वर्गीकरण केले आहे. साडेतीन हजार गावांपैकी १४५० गावांची नावे वनस्पतींच्या नावांवरून पडलेली आहेत. सुमारे २०० गावांच्या नावांना नगर-नयर-नर किंवा नेर प्रत्यय आहे.

अकराळे-अकरा (आंवळी)अकरापल्लं, अकलाड-आक्कल(अक्कल काढा)आकल्लवाटंं, अकुरडी-अकरूरवाटिका (अकरुर नावाच्या यादवावरून), अंकुशविहीर-अकंुशा (जैनदेवता)अंकुशाविवरिका, अंचळवाडी-अंजलिक (उंदीर)अंजलिका वाटिका, अंजनी-अंजनी (कुटकी, काळी कापशी), अडावद-अ्ट(बाजाराचे गांव, कसबा) अ्टावर्त, अमळनेर-अमला(आंवळी), एरंंडोल-एरंडपल्ल, कान्हेरी-कन्हगिरी, कापडणे-कर्पटिन (वारकरी, भिकारी) कर्पटिस्थानं, कामथवाडी-कर्मस्थ (कुळकरणी, कायस्थ), कामपूर- काम्ये (संुदर), कासोदा-काशमर्द =कासवद, कासोदे-काश (तृणविशेष), कासारे-कासार (तळे), कासली-कासर(रेडा, गवा), कुंडाणे-कुंड (गोळक), कुसंुबे-वनकौशांबी-कुशांब (कुशनाभाचा वडील भाऊ), खामगाव-स्कंभ (वैदिक देवता), गाळण-गावल्गण (ऋषिनाम), चोपडे-चतुर (चार)-चतुःपटं, चोरगाव-चकोरग्राम, चोरवड-चकोरवट, जळगाव-जलूकाग्राम, जळोद-जलूकाप्रदंं, जातेगाव-जतिर्क(पंजाबातील लोक), जामनेर-जंुबनीवरंं, तळोदे-तलपद्ं, दाऊळ-दात्यूह (कोकीळ), दाभाडी-दर्भवाटिका, दिघावे-दीर्घ (ऊंट), दुसाणे-दुःसथ (कोंंबडा), धुळे-धूलि-धूलिकं, नकाणे-नखिन(सिंह), नकाणे-नक (दारुकपुत्र) नकवनं, नगाव-नग (पर्वत), नंदूरबार-नंदक (नांदुखीर्) नंदकपुरद्वार, नवापूर-नव (अभ्रक), न्हावी-नापित (स्नापित) नापितका, न्याहाळी-नदीवाहालि, नेहते-निहाका(घोरपड), पाळधी-पलदी (ग्रामनाम), बेटावद-वेष्ठक(कोहळा), भामेर-भंभ (माशी), यावल-यामल(गोत्रनाम) यापद्धतीने खानदेशातील सुमारे अडीच तीन हजार गावांच्या नावाच्या व्युत्पत्तिचा इतिहासाचार्य राजवाडेंनी धांडोळा घेतला आहे.

स्मारके, डोंगर, किल्ले, नदी, तलाव, जलाशय[संपादन]

महाराष्ट्रातील स्थलनामांचे अभ्यासक[संपादन]

स्फुट स्वरूपात म्हणता येईल असे, परंतु मूलगामी स्वरूपाचे काम पां. वा. काणे, वि. का. राजवाडे तसेच वा. वि. मिराशी, सुमती मुळे, मालती महाजन यांनी केले; तसेच डॉ. ठोसर यांच्या विद्यार्थ्यांनीही या क्षेत्रात काही काम केले आहे. स्वतः ठोसर यांनी मराठवाडा विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधासाठी मराठवाडा क्षेत्रापुरते काम केले होते (1977). पां. वा. काणे, वि. का. राजवाडे यांच्या अभ्यासातून प्रेरणा घेऊन गतकालीन शिलालेख व ताम्रपटातील नोंदींचा अभ्यास करून त्यातून व्यक्त होणारी स्थलनामे, भौगोलिक संदर्भ आणि व्यक्तिनामे यांचा विस्तृत अभ्यास करून त्याआधारे ऐतिहासिक भूगोल, महसुली विभाग, प्रशासकीय विभाग व स्थळांच्या उत्पत्तीच्या संदर्भात प्रकाश टाकण्याचे काम डॉ. ठोसर यांनी केले.[८]



संदर्भ[संपादन]

  1. ^ "अशी पडली गावांची नावे-मटा". Archived from the original on 2009-08-26. 2011-04-17 रोजी पाहिले.
  2. ^ http://docs.google.com/viewer?a=v&q=cache:hqj-gQr8PGoJ:www.maharashtra.gov.in/pdf/Land%2520%26%2520People%2520%2520Final/L%2520%26%2520P%2520pdf/Chapter%2520III/4%2520Plac%2520e%2520Names%2520in%2520Maharashtra%2520and%2520Cultural%2520Sub-regions.pdf+Maharashtra+Placenames&hl=en&gl=ng&pid=bl&srcid=ADGEESh1FYwHy43olGp1wm4s0eVJBh6f6uIpOPa-MYK6blwRO7EQ4yTuX38kgJQbboDrtXo14zVsYBCg34ISwfhPqKb0MH6APYBFpUq-JEJcjDwoW2XkCCW9gcSAce7bN5i4ICMsMAxT&sig=AHIEtbQfSqm1lLlYzrquyO9fhF-dNbsaEg
  3. ^ http://books.google.com.ng/books?id=M1JIPAN-eJ4C&pg=PA232&lpg=PA232&dq=Maharashtra+Placenames&source=bl&ots=ieomG-JRZP&sig=rbjdH6YPl1AKcYDmDRP4yR8qoYA&hl=en&ei=E7qqTeHIC5HxsgbdkMyZBw&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=10&ved=0CFIQ6AEwCQ#v=onepage&q=ur&f=false
  4. ^ http://en.wikipedia.org/wiki/Urmia हा लेख दिनांक १७ एप्रिल २०११ रोजी ४ वाजता जसा दिसला
  5. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2013-07-14. 2011-04-17 रोजी पाहिले.
  6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2007-01-26. 2011-04-17 रोजी पाहिले.
  7. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-08-26. 2011-04-17 रोजी पाहिले.
  8. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1172347[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती

अधिक वाचन[संपादन]

  • हिस्टॉरिकल जिऑग्राफी ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा' लेखक डॉ. हरिहर एस. ठोसर