Jump to content

जी. वेंकटस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गद्दम वेंकटस्वामी (तेलुगू: గుడిసెల వెంకటస్వామి ; रोमन लिपी: G. Venkat Swamy / Gaddam Venkat Swamy) (ऑक्टोबर ५, इ.स. १९२९ - डिसेंबर २२, इ.स. २०१४) हे तेलुगू-भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.।

कारकीर्द

[संपादन]

जी. वेंकटस्वामी इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील सिद्दीपेट लोकसभा मतदारसंघातून तेलंगण प्रजा समिती पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९७७च्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. पण इ.स. १९७८ मध्ये ते आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इ.स. १९७८ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी आंध्र प्रदेश राज्याचे कामगारमंत्री म्हणून काम बघितले. पुढे ते इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. २००४च्या निवडणुकांमध्ये ते आंध्र प्रदेश राज्यातील पेदापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये ते फेब्रुवारी १०, इ.स. १९९५ ते सप्टेंबर १५, इ.स. १९९५ या काळात वस्त्रोद्योगमंत्री आणि सप्टेंबर १५, इ.स. १९९५ ते मे १६,इ.स. १९९६ या काळात कामगारमंत्री होते.