जी. वेंकटस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गद्दम वेंकटस्वामी (तेलुगू: గుడిసెల వెంకటస్వామి ; रोमन लिपी: G. Venkat Swamy / Gaddam Venkat Swamy) (ऑक्टोबर ५, इ.स. १९२९ - हयात) हे तेलुगू-भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य आहेत।

कारकिर्द[संपादन]

जी. वेंकटस्वामी इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील सिद्दीपेट लोकसभा मतदारसंघातून तेलंगण प्रजा समिती पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९७७ च्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. पण इ.स. १९७८ मध्ये ते आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इ.स. १९७८ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी आंध्र प्रदेश राज्याचे कामगारमंत्री म्हणून काम बघितले. पुढे ते इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. २००४ च्या निवडणुकांमध्ये ते आंध्र प्रदेश राज्यातील पेदापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये ते फेब्रुवारी १०, इ.स. १९९५ ते सप्टेंबर १५, इ.स. १९९५ या काळात वस्त्रोद्योगमंत्री आणि सप्टेंबर १५, इ.स. १९९५ ते मे १६,इ.स. १९९६ या काळात कामगारमंत्री होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.