साचा:महाराष्ट्र शासन/अधिकारी परिचय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उद्धव ठाकरे[संपादन]

‌‌

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (जन्म : २७ जुलै १९६०) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. इ.स. २००३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या कडे देण्यात आली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.१४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.

आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली व ५६ आमदार निवडून आणले! पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडी चे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.

पुढे वाचा... उद्धव ठाकरे

 * येथे राज्य शासनातील एका अधिकारी किंवा मंत्री यांचा अल्प परिचय देण्यात येतो.