जिनिव्हा सरोवर (फ्रेंच: Lac Léman, Léman, जर्मन: Genfersee) हे स्वित्झर्लंड व फ्रान्स देशांच्या सीमेवरील आल्प्स पर्वतरांगेतील एक सरोवर आहे. ५८० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या सरोवराचा ५९.५३ टक्के भाग स्वित्झर्लंडच्या तर उर्वरित भाग फ्रान्सच्या अखत्यारीखाली येतो. जिनिव्हा सरोवराच्या भोवताली स्वित्झर्लंडची व्हो, व्हाले व जिनिव्हा ही राज्ये तर रोन-आल्प हा फ्रान्सचा प्रदेश आहेत.
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा व लोझान ही मोठी शहरे ह्याच सरोवराच्या काठावर वसलेली आहेत.