Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/जुलै २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखपृष्ठ सदर लेख
काझीरंगा अभयारण्य
काझीरंगा अभयारण्य

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (असमीया: কাজিৰঙা ৰাষ্ট্ৰীয় উদ্যান, (Kazirônga Rastriyô Uddan), उच्चार /kaziɹɔŋga ɹastɹijɔ udːan/ ) हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाटनागांव जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थानात केलेला असून, जगात सापडणार्‍या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतियांश गेंडे या अभयारण्यात सापडतात. काझीरंगा मध्ये अनेक वाघ असून २००६ मध्ये याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या जंगलात अनेक हत्ती, पाणम्हशी तसेच हरणे आढळतात. काझीरंगा अभयारण्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात. काझीरंगा हे भारतातील सर्वात जास्त सुरक्षित अभयारण्य मानले जाते.

काझीरंगा मध्ये चार प्रमुख नद्या आहेत. यापैकी मुख्य म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी होय. तसेच अनेक छोटे-मोठे पाण्याचे तलाव सुद्धा आढळतात. काझीरंगाला १९०५ मध्ये संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला होता.

काझीरंगा हे वाघांचे एक मुख्य आश्रयस्थान आहे. काझीरंगा उद्यानाला २००६ साली व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. या उद्यानात जगातील सर्वात जास्त वाघांची घनता आढळते (एक वाघ प्रति ५ वर्ग कि.मी. मध्ये). २००० च्या गणनेनुसार या जंगलात ८६ वाघ आहेत. वाघांखेरीज इथे रानमांजर, बिबटेपाणमांजरी सुद्धा आढळतात. इतर छोट्या प्राण्यांमध्ये मुंगूस, कोल्हा, तरस, अस्वल, इ. प्राणी सुद्धा इथे दिसतात. भारतात आढळणार्‍या माकडांच्या १४ जातींपैकी ९ जाती या उद्यानात आढळतात. यांमध्ये आसामी माकड, सोनेरी वानर व भारतात आढळणारे एकमेव एप माकड यांचा समावेश होतो. काझीरंगाच्या नद्यांमध्ये दुर्मिळ असे डॉल्फिन सुद्धा आढळतात.

पुढे वाचा...