उत्तर व्हियेतनाम
व्हियेतनामचे लोकशाही प्रजासत्ताक Việt Nam Dân chủ Cộng hòa | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: "Độc lập – Tự do – Hạnh phúc" (स्वातंत्र्य, मुक्तता, आनंद) |
||||
राजधानी | हनोई | |||
शासनप्रकार | कम्युनिस्ट राष्ट्र | |||
राष्ट्रप्रमुख | -१९४५-६९ हो चि मिन्ह -१९६९-७५ टोन डुक थांग |
|||
अधिकृत भाषा | व्हियेतनामी, रशियन | |||
क्षेत्रफळ | १,५७,८८० चौरस किमी | |||
लोकसंख्या | १,५९,१६,९५५ (१९६०) २,३७,६७,३०० (१९७४) |
|||
–घनता | १००.८/चौ.किमी. प्रती चौरस किमी |
उत्तर व्हियेतनाम हा आग्नेय आशियामधील वर्तमान व्हियेतनामाच्या उत्तर भागात इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. १९४० च्या दशकात हो चि मिन्ह ह्या व्हियेतनामी पुढाऱ्याने व्हियेत मिन्ह नावाची स्वातंत्र्यचळवळ सुरू केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर व्हियेत मिन्हने फ्रेंच इंडोचीनपासून स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४५ ते १९५४ दरम्यान चाललेल्या पहिल्या इंडोचीन युद्धामध्ये व्हियेत मिन्हने फ्रान्सला पराभूत केल्यानंतर झालेल्या जिनिव्हा परिषदेमध्ये व्हियेतनामचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे केले गेले. त्यानंतर एकाच वर्षात दक्षिण व्हियेतनामने कम्युनिस्ट राजवट अंगीकारून उत्तरेसोबत विलीनीकरणाची अट फेटाळल्यामुळे व्हियेतनाम युद्धास सुरुवात झाली.
सुमारे २० वर्षे चाललेल्या व्हियेतनाम युद्धात पुन्हा एकदा उत्तरेची सरशी झाली. १९७५ साली दक्षिण व्हियेतनामला उत्तरेच्या कम्युनिस्ट राजवटीखाली विलिन करण्यात आले व व्हियेतनाम हा एकसंध देश बनला.
बाह्य दुवे
[संपादन]- "स्वातंत्र्याची घोषणा" (इंग्लिश भाषेत). 2006-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित.CS1 maint: unrecognized language (link)