Jump to content

मास्टर (कलावंत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुमार गंधर्व
बालगंधर्व

जे कलावंत अगदी लहान वयापासून कलाक्षेत्रात असतात त्यांना मराठीत बाल, बाल कलाकार, बेबी किंवा मास्टर म्हणायची पद्धत आहे.

महाराष्ट्रातील असे कलावंत
  • कुमार गंधर्व (शिवपुत्र सिद्राम कोमकल्ली). यांनी वयाच्या सातव्या वर्षी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायला प्रारंभ केला.
  • छोटा गंधर्व (सौदागर नागनाथ गोरे). वयाच्या दहाव्या वर्षी संगीत नाटकात ससंगीत अभिनय.
  • बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
  • बालगंधर्व (नारायण श्रीपाद राजहंस)
  • बेबी तबस्सुम
  • बेबी नंदा
  • बेबी नाझ (सलमा बेग)
  • बेबी शकुंतला (उमादेवी नाडगोंडे-माहेरची शकुंतला महाजन)
  • मास्टर अविनाश (बालनट गणू अर्थात गणपतराव मोहिते}
  • मास्टर कृष्णराव (बालनट मास्टर कृष्णा अर्थात मास्तर कृष्णराव, कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर)
  • मास्टर गामा (मसर गुलाम हुसेन गामा -पारशी रंगभूमी-अल्फ्रेड नाटक मंडळीचे कलावंत)
  • मास्टर जगन्नाथ (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर छोटू (मराठी चित्रपट संत तुकाराममध्ये बालनट. फ़ौलादी मुक्का, लुटारू ललना, पंजाब मेल, बंबईवाली आदी हिंदी चित्रपटांचे नायक)
  • मास्टर दत्ताराम (वळवईकर)
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर
  • मास्टर निसार (हिंदी बोलपटांतील आद्य गायक अभिनेता-जन्म १९०१), ’इंद्रसभा’या चित्रपटात त्यांची आणि जहॉंआरा कज्जनबाई यांची एकूण ७१ गाणी होती.)
  • मास्टर नैनूराम (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर परशुराम (परशुराम लक्ष्मण सोनिस)
  • मास्टर भगवानदास (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर भोगीलाल (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर मोहंमद (लंका दहन, सीता स्वयंवर, राजा हरिश्चंद्र आदी सुमारे ३० हिंदी चित्रपटांतील कलावंत)
  • मास्टर मोहन (पारशी रंगभूमीचे कलावंत)
  • मास्टर रवि (पद्मिनी कोल्हापुरे नायिका असलेल्या ‘प्रोफेसर की पडोसन’ आणि ‘जमानों को दिखाना है’ या चित्रपटांचे नायक)
  • मास्टर विठ्ठल (पहिला हिंदी बोलपट ’आलमआरा’चे नायक)
  • मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी)
  • मास्टर शांताराम : तबलावादक चंद्रकांत कामत यांचे गायक वडील.

पंजाबी शास्त्रीय गायक

[संपादन]
  • मास्टर मदन