Jump to content

उमरगाम (वलसाड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?उमरगाम

गुजरात • भारत
—  नगर  —
उमरगाम, भारत
उमरगाम, भारत
Map

२०° १२′ ००″ N, ७२° ४५′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
लोकसंख्या ३४,८३५ (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ३९६१७०
• +२६०
• GJ-15
संकेतस्थळ: वलसाड जिल्हा नगर परिषदा संकेतस्थळ

उमरगाम (उंबरगांव) (गुजराती: ઉમરગામ) हे वलसाड जिल्हा, गुजरात मधील एक नगर आहे. हे उमरगाम तालुक्याचे मुख्यालय आहे. ह्या गावाचे नाव घेतल्यास बहुतांश लोक आजही वृंदावन स्टुडिओ असलेले गाव असेच म्हणतील. इथली औद्योगिक वसाहत आणि समुद्रकिनारा देखील बहु परीचित आहेत. भारतातील नॅनो तंत्रज्ञानावर आधारित पहिला कारखाना येथील औद्योगिक वसाहतीत आहे [].

उमरगाम नगर परिषदेत समुद्राजवळील नागरी वसाहत तसेच लोह मार्ग स्थानकाजवळील औद्योगिक वसाहत ह्यांचा समावेश आहे.

नावाबद्दल

[संपादन]

ह्या गावाचे मूळ नाव उंबरगांव असे आहे. गावातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्रातील बहुतांश जनता अजून ह्याच नावाचा वापर करते. गुजरात मध्ये बोलीभाषेत ह्याचे नाव उमरगाम असे केले आहे. सरकारी कारभारात दोन्ही नावे वापरली जातात. खाली काही थोडी उदाहरणे दिली आहेत. अपेक्षित व्यवहाराप्रमाणे योग्य नावाचा वापर करावा.

उंबरगांव

  1. गुजरात राज्य महसूल विभागाचा उंबरगांव तालुक्याचा नकाशा []
  2. भारताचा २०११चा जनगणना अहवाल []
  3. वलसाड जिल्ह्यातील न्यायालयीन कारभारी []
  4. वलसाड जिल्हा प्रेक्षणीय स्थळांच्या संकेतस्थळावर नारगोळ किनाऱ्याचा पत्ता उंबरगांव असा आहे []

उमरगाम

  1. वलसाड जिल्हा संकेतस्थळ - येथे उमरगांव नगरपरिषद, उंबरगांव नगर, उमरगाम, गुजरात, ३९६१७० असा आहे[]

मिश्र वापर

  • गुजरातेतील विधानसभा मतदारसंघ क्र १८२ उंबरगांव नावाने आहे. उमेदवारांच्या पत्त्यात उमरगाम गावाचा उल्लेख होतो [].
  • भारतीय टपाल खाते[]
    • उमरगाम तालुक्यातील टपाल कार्यालये
      • उमरगाम एस. ओ. (पिन कोड ३९६१७०)
      • देहरी बी. ओ. (पिन कोड ३९६१७०)
    • उंबरगांव तालुक्यातील कार्यालये
      • गोवडा बी. ओ. (पिन कोड ३९६१७०)
      • पालगाम बी. ओ. (पिन कोड ३९६१७०)
      • उमरगाम आय.इ.एस. ओ. (पिन कोड ३९६१७१)
  • रिजर्व बँक[]
    • उंबरगांव स्थित शाखा
      • बँक ऑफ बरोडा - गाव
      • बँक ऑफ बरोडा - औद्योगिक वसाहत
      • स्टेट बँक ऑफ इंडिया - गाव
      • स्टेट बँक ऑफ इंडिया - औद्योगिक वसाहत
      • फिनो पेमेंट्स बँक मर्यादित - औद्योगिक वसाहत
      • कॅनरा बँक
      • इंडसइंड बँक
      • ऍक्सिस बँक मर्यादित
      • एच.डी.एफ.सी. बँक मर्यादित
    • उमरगाम स्थित शाखा
      • बंधन बँक मर्यादित
  • सागरी मत्स्यव्यवसाय गणना २०१०चा वार्षिक अहवाल - उमरगाव, उंबरगांव तालुका[१०]

इतिहास

[संपादन]

१९६० मध्ये मुंबई इलाख्याच्या विभाजनाचे वेळी [११] हे गाव ठाणे जिल्ह्यातून सुरत जिल्ह्यात गेले. १ जून १९६४ रोजी वलसाड जिल्हा बनला त्या वेळेस हे गाव त्यात घेतले गेले.

डांग, उंबरगाव, बेळगाव, कारवारचा आपल्या राज्याला झालेला विरह अण्णाभाऊ साठे ह्यांनी ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ या लावणीतून मांडला[१२].

हवामान, भूगोल आणि लोकसंख्या

[संपादन]

भौगोलिक स्थान

[संपादन]

उमरगाम हे मूलतः समुद्र किनारी वसलेले गाव आहे. उमरगाम आणि नारगोल ह्या गावांमध्ये तुम्ब नदीची खाडी आहे. औद्योगिक वसाहत उमरगाम रोड ह्या लोह मार्ग स्थानकाजवळ स्थित आहे.

जल संपत्ती

[संपादन]

इथे सीमा शुल्क खात्याचे कार्यालय आहे. काही शक्तीशाली नौका देखील तैनात असतात.

इथला दिपस्तंभ समुद्र पातळीपासून ३५ मी. उंच असून प्रकाश दर १५ सेकंदाने फेकला जातो[१३].

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय गणनेच्या वार्षिक अहवालांमध्ये उमरगामची गणना मासेमारीच्या प्रमुख बंदरांमध्ये होते. येथील नावा “UBR” अशा मालिकेत नोंदणीकृत होतात.

हवामान

[संपादन]

समुद्रा मुळे इथली आर्द्रता जास्त (४८% ते ८२%) असते[१४].

लोकसंख्या

[संपादन]

उमरगाम नगरपालिकेची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३४,८३५ आहे. गावठाणची लोकसंख्या २७,८५९ असून त्यात १५,२१५ पुरुष आणि १२,६४४ महिला आहेत. औद्योगिक वसाहतीची लोकसंख्या ६,९७६ असून त्यात ३,७८८ पुरुष आणि ३,१८८ महिला आहेत[१५].

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

येथील समुद्र किनारा प्रसिद्ध आहे.

वृंदावन स्टुडिओला अनेक पर्यटक सहली आलेल्या आहेत. रामायण, महाभारत आणि इतर अनेक मालिकांचे तसेच चित्रपटांचे चित्रीकरण वृंदावन स्टुडिओ येथे झाले आहे. [१६].

शैक्षणिक संस्था

[संपादन]

गावात गुजरात राज्य शैक्षणिक मंडळ तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाशी संलग्न अशा अनेक शाळा व कॉलेजेस आहेत.

१९१९ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीने येथील मावजी माधवजी इंग्रजी शाळा चालवायला घेतली. ह्या शाळेला वासुदेव गोपाळ परांजपे ह्यांचे मोठे योगदान लाभले.

दळणवळणाची सुविधा

[संपादन]

दळणवळणाचे मुख्य साधन लोहमार्ग आहे. उमरगाम रोड (UBR) रेल्वे स्थानकावरून दोन्ही दिशांना जाणाऱ्या २८ गाड्या थांबतात. ह्या व्यतिरिक्त उमरगाम वलसाड मेमू (६९१५३) ह्या गाडीचे हे उगम स्थान आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ (तलासरी) गावठाण पासून साधारणतः २२ कि.मी. अंतरावर आहे. येथून रस्त्यानी इतर प्रमुख ठिकाणी जाता येते.

गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसेस गुजरातेतील तसेच महाराष्ट्रातील गावांपर्यंत जातात. उमरगाम ते अंबाजी ह्या जवळपास ६०० कि.मी. अंतराच्या प्रवासासाठी देखील बसेस आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ भारतातील नॅनो तंत्रज्ञानावर आधारित पहिला कारखाना (इंग्रजी मजकूर)
  2. ^ "उंबरगांव तालुक्याचा नकाशा (इंग्रजी मजकूर)" (PDF). 2016-09-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2020-07-23 रोजी पाहिले.
  3. ^ वलसाड जिल्हा जनगणना अहवाल, भाग ब (इंग्रजी मजकूर)
  4. ^ न्यायालयीन कारभाऱ्यांची नावे (इंग्रजी मजकूर)
  5. ^ वलसाड जिल्हा प्रेक्षणीय स्थळे (इंग्रजी मजकूर)
  6. ^ वलसाड जिल्हा नगर परिषदा (इंग्रजी मजकूर)
  7. ^ मतदार कक्षांची यादी (इंग्रजी मजकूर)
  8. ^ पिन कोड शोध (इंग्रजी मजकूर)
  9. ^ बँक शाखा शोध (इंग्रजी मजकूर)[permanent dead link]
  10. ^ सागरी मत्स्य गणना (इंग्रजी मजकूर)
  11. ^ ठाणे जिल्हा भूगोल (इंग्रजी मजकूर)
  12. ^ लोकसत्ता संपादकीय अग्रलेख ‘समग्र’ अण्णाभाऊ दिनांक १ ऑगस्ट २०२०
  13. ^ दिपस्तंभ आढावा (इंग्रजी मजकूर)
  14. ^ वलसाड जिल्हा जनगणना अहवाल, भाग अ (इंग्रजी मजकूर)
  15. ^ वलसाड जिल्हा जनगणना अहवाल, भाग ब (इंग्रजी मजकूर)
  16. ^ वृंदावन स्टुडिओ बद्दल लेख (इंग्रजी मजकूर)

बाह्य दुवे

[संपादन]