चेस्टर (इंग्लंड)
city in Cheshire, England | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | शहर, county town, unparished area | ||
---|---|---|---|
स्थान | Cheshire West and Chester, चेशायर, वायव्य इंग्लंड, इंग्लंड | ||
स्थापना |
| ||
महत्वाची घटना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
चेस्टर हे इंग्लंडच्या चेशायर काउंटी मधील शहर आहे. हे वेल्स सीमेजवळ डी नदीवर वसलेले आहे.२०२१मध्ये येथील लोकसंख्या ९२,७६० इतकी होती.[१]
चेस्टर शहराचीची स्थापना इ.स. ७९ मध्ये सम्राट वेस्पाशियनच्या कारकिर्दीत डीव्हा व्हिक्ट्रिक्स नावाचा रोमन किल्ला म्हणून झाली. रोमन ब्रिटनमधील मुख्य सैन्य छावण्यांपैकी एक असलेल्या या किल्ल्याभोवती कालांतराने एक मोठी नागरी वस्ती बनली. ६८९ साली मर्सियाचा राजा एथेलरेड याने येथे चर्च बांधल्याची नोंद आहे. इंग्लंडवरील नॉर्मन आक्रमणात चेस्टर हे नॉर्मन ताब्यात गेलेल्या शेवटच्या शहरांपैकी एक होते. विल्यम द कॉन्कररने शहर आणि जवळच्या वेल्श सीमेवर वर्चस्व राखण्यासाठी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. १५४१मध्ये चेस्टरला शहराचा दर्जा देण्यात आला.
वस्तीविभागणी
[संपादन]२०११ च्या जनगणनेनुसार, चेस्टरमध्ये सुमारे १,१०,००० किंवा ९०.९% लोक गोरे ब्रिटिश होते. १.०% स्वतःला आयरिश म्हणवत तर 3.6% लोक इतर गोरे होते. २.२% लोकांनी स्वतःचे आशियाई म्हणून वर्णन केले आणि १.३% लोक मिश्रवंशीय होते. ०.६% कृष्णवर्णीय आणि ०.३% इतर वंशाचे लोक येथे होते. [२] चेशायर वेस्ट आणि चेस्टरमध्ये ७६.४% ख्रिश्चन आहेत. १४% लोक निधर्मी आणि ८.२% लोकांनी आपला धर्मन उघड केला नाही. यांशिवाय येथील ०.७% लोक मुस्लिम आहेत, ०.१% शीख ०.१% ज्यू आणि ०.२% लोक बौद्ध आहेत. [३]
शिक्षण
[संपादन]चेस्टर विद्यापीठाचे मुख्य आवार या शहरात आहे. १५४१मध्ये हेन्री आठव्याने स्थापन केलेली किंग्ज स्कूल ही मुलींची शळा चेस्टरमध्ये आहे.[४]
वाहतूक
[संपादन]जुळी शहरे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Cheshire West and Chester (Unitary District, Cheshire West and Chester, United Kingdom) - Population Statistics, Charts, Map and Location". www.citypopulation.de. 2024-04-28 रोजी पाहिले.
- ^ "BME Mapping Report" (PDF). October 2014. 28 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 20 November 2016 रोजी पाहिले.
- ^ "Release Edition Reference Tables". Ons.gov.uk. 17 June 2004. 27 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 November 2012 रोजी पाहिले.
- ^ "Queen's School marks royal milestone with a week of celebration". The Chester Chronicle. 8 September 2015. 24 September 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Chester Twin Towns Come Together For Annual Meeting". Chester Chronicle. 20 October 2011. 16 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 August 2014 रोजी पाहिले.