Jump to content

इंग्लंडचा पहिला विल्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंडचा पहिला विल्यम
मानव
लिंगपुरूष संपादन
स्थानिक भाषेतील नावWilliam I the Conqueror, Wilhelm se Gehīersumiend, Guillaume le Conquérant, Gllâome lé Counqùéreus संपादन
जन्म-नावGuillaume संपादन
दिलेले नावविल्यम संपादन
उत्कृष्ट पदवीDuke of Normandy, monarch of England संपादन
उपनावle Conquérant, the Conqueror, William the Conqueror, ウィリアム征服王 संपादन
जन्म तारीख८ नोव्हेंबर 1028 संपादन
जन्मस्थानFalaise संपादन
मृत्यू तारीख९ सप्टेंबर 1087 संपादन
मृत्यूस्थानरोआँ संपादन
चिरविश्रांतीस्थानAbbey of Saint-Étienne, Caen संपादन
वडीलRobert I, Duke of Normandy संपादन
आईHerleva संपादन
भावंडेOdo, Earl of Kent, Robert, Count of Mortain, Adelaide of Normandy संपादन
वैवाहिक जोडीदारMatilda of Flanders संपादन
नातेवाईकEdward the Confessor, Odo, Count of Champagne संपादन
कुटुंबनॉर्मन राजवंश संपादन
मातृभाषाOld Norman संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाOld Norman संपादन
व्यवसायराजा संपादन
पदmonarch of England, Duke of Normandy संपादन
धर्मकॅथलिक धर्म संपादन
युद्धBattle of Val-ès-Dunes, Norman conquest of England संपादन
Has works in the collectionArchives nationales संपादन
Depicted byKing William I ('The Conqueror') संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन

पहिला विल्यम (इ.स. १०२८ - इ.स. १०८७) हा इंग्लंडचा एक राजा होता. त्याची कारकीर्द १०६६ ते १०८७ होती.

विल्यम इंग्लंडवर राज्य करणारा नॉर्मन वंशाचा पहिला राजा होता. त्याचा जन्म आता फ्रांसचा भाग असलेल्या नॉर्मंडीमध्ये झाला. १०६६ साली इंग्लंडवर हल्ला करून व हेस्टींग्सच्या लढाईत हॅरल्ड गॉडविनसन या इंग्लंडच्या तत्कालीन राजाचा पराभव करून विल्यमने इंग्लंडचे राज्य बळकावले. ही लढाई इंग्लंडच्या इतिहासास कलाटणी देणारी मानली जाते. विल्यमच्या विजयाने इंग्लंडवरचे ॲंग्लो-सॅक्सन वंशाचे राज्य कायमचे संपुष्टात आले. विल्यमच्या विजयाने इंग्लंड देश, इंग्रजी संस्कृती, इंग्रजी स्थापत्य व इंग्रजी भाषा या सर्वांवर कायमचे बदल घडले. विल्यमने स्थापिलेले नॉर्मन इंग्लड जवळजवळ शंभर वर्षे टिकले व शेवटी विल्यमच्या वंशजांमधल्ये तंट्यात बुडाले. प्रशासनासाठी देशा-समाजासंबंधीच्या सखोल आकडेवारीचा उपयोग करणारा पहिला राज्यकर्ता म्हणूनही विल्यम ओळखला जातो. डूम्स डे बुक या त्याने संकलन करून घेतलेल्या अकराव्या शतकातील पुस्तकात तत्कालीन इंग्लडच्या सार्वजनिक व व्यक्तिगत संपत्तीचे सविस्तर आकडे आहेत. विल्यमच्या मृत्यूपश्चात त्याचा मुलगा दुसरा विल्यम इंग्लंडचा राजा झाला.