उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)
उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ) या पुस्तकात मराठी भाषेचे दैनंदिन व्यवहारात उपयोजन कसे होते आणि त्यातून रोजगारनिर्मिती कशी होते हे दाखविले आहे. डॉ.केतकी मोडक, संतोष शेणई व सुजाता शेणई या संपादक-त्रयीने प्राध्यापक डॉ.गं.ना.जोगळेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुस्तक लिहिले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक, व्यावसायिक या सर्वांना उपयुक्त ठरेल असे हे संदर्भसाहित्य आहे.
उपयोजित मराठी
(डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ) | |
लेखक | डॉ.केतकी मोडक, संतोष शेणई, सुजाता शेणई |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | अभ्यासपर लिखाण |
प्रकाशन संस्था | पद्मगंधा प्रकाशन |
प्रथमावृत्ती | १४ ऑगस्ट २०१२ |
मुखपृष्ठकार | महेश मोडक |
पृष्ठसंख्या | २४० |
आय.एस.बी.एन. | 978-93-82161-18-9 |
पुस्तकाचा आशय
[संपादन]कार्यालयीन पत्रव्यवहार, नोकरीसाठी अर्जलेखन, गटचर्चा, इतिवृत्त लेखन, अहवाल लेखन, सारांश लेखन, टिपण्णी लेखन, लेखनविषयक नियम, ग्रंथपरीक्षण, परिभाषा, शोधनिबंध, कोशवाङ्मय, सूत्रसंचालन इत्यादी २५ विषयांवरील लेखन या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहे.
पुस्तकाचे वैशिष्ट्य
[संपादन]प्रा. रा. ग. जाधव, डॉ. सु. रा. चुनेकर यांसारख्या भाषेच्या ज्येष्ठ जाणकारांनी आणि सुधीर गाडगीळ, संदीप खरे, डॉ.भूषण केळकर यांसारख्या मान्यवर व्यावसायिकांनी अधिकारवाणीने मराठीच्या व्यवहारातील प्रत्यक्ष उपयोजनाविषयी या पुस्तकात विचार मांडलेले आहेत.
मान्यता
[संपादन]सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या ग्रंथास संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता दिलेली आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रम २०१९" (PDF). unipune.ac.in.