तात्याराव लहाने
Appearance
तात्याराव लहाने | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी. |
पेशा | नेत्रतज्ञ |
प्रसिद्ध कामे | बिनाटाक्याच्या नेत्रशस्त्रक्रिया |
मूळ गाव | माकेगाव,ता.रेणापूर,जि.-लातूर,महाराष्ट्र,भारत |
ख्याती | सुमारे १,६३,००० यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया,कधीकधी यासाठी १८ ते २३ तास काम [१] |
पदवी हुद्दा | अधिष्ठाता,ग्रॅंट कॉलेज व जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स,मुंबई |
आई | अंजनाबाई लहाने |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार |
डॉ. तात्याराव लहाने (पद्मश्री) (जन्म:इ.स....हयात) मुंबईच्या जे.जे.(जमशेदजी जिजीभॉय) रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत.
बालपण आणि शिक्षण
[संपादन]लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.
डॉ. तात्याराव लहाने यांचा करिअरग्राफ
[संपादन]१९८१ : मराठवाडा विद्यापीठातून मेडिसिनमधील पदवी प्राप्त.
१९८५ : एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी.
१९९४ : जे.जे.रुग्णालय - नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख.
२००४ : "जे. जे.'त रेटिना विभागाची सुरुवात.
२००७ : मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया.
२००८ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
२०१० : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता
==तात्याराव लहाने यांना मिळलेले पुरस्कार
- १८ फेब्रुवारी २०११ या दिवशी भरलेल्या समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान झाला.
- छत्रपती शाहू पुरस्कार (२०२०)